Photo Credit= X

SA20 2025 Fan wins 90 lakhs by catching with one hand: न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन (Kane Williamson)सध्या दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या एसएट्वेन्टी मध्ये खेळत आहे. या स्पर्धेत डर्बन सुपर जायंट्सकडून(Durban Super Giants vs Pretoria Capitals) विल्यमसन खेळत आहे. विल्यमसनने स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात एक शानदार षटकार ठोकला. जो थेट प्रेक्षकांच्या गॅलरीत पोहोचला. जिथे एका प्रेक्षकाने एका हाताने झेल घेऊन सुमारे 90 लाख रुपये(90 Lakh Rupees Catch In 2025 SA20) जिंकले. ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे. (NZ vs SL, 3rd ODI 2025 Mini Battle: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोणता खेळाडू कोणावर मात करेल? घ्या जाणून)

सामन्यादरम्यान केले विल्यमसनने 40 चेंडूत 60 धावांची सर्वाधिक खेळी खेळली. यात त्याने 3 चौकार आणि 2 षटकार झळकावले. केनने लेग साइडवर एक उत्तुंग षटकार मारला, जो प्रेक्षक गॅलरीत पोहोचला. जिथे उपस्थित असलेल्या एका चाहत्याने तो चेंडू एका हाताने पकडला. या कॅचसाठी चाहत्याला 20 लाख दक्षिण आफ्रिकन रँड म्हणजेच सुमारे 90 लाख रुपये मिळाले.

केन विल्यमसनच्या षटकाचा झेल

या लीगच्या नियमांनुसार, 18 वर्षांवरील प्रेक्षकाला एका हाताने षटकाराचा क्लीन कॅच घेणाऱ्यांना 10 लाख रँडचे बक्षीस ठेवले होते. विशेष म्हणजे जर झेल घेणारा चाहता सामन्यापूर्वीच शीर्षक प्रायोजकाचा ग्राहक असेल, तर त्याची बक्षीस रक्कम दुप्पट केली जाते.