SA vs ENG 1st Test: जेम्स अँडरसन याने टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास, 150 व्या मॅचमध्ये पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट
जेम्स अँडरसन | File Image (Photo Credit: Getty Images)

यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि इंग्लंड (England) संघात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना सेंच्युरियनच्या मैदानात खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याने इतिहास रचला आहे. अँडरसनचा टेस्ट करिअरमधील हा 150 वा सामना आहे. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात 150 मॅच खेळणारा अँडरसन  गोलंदाज आहे. इतकेच नाही तर अँडरसनने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आहे. यावर्षी आतापर्यंत अँडरसनने वर्षाच्या शेवटच्या कसोटी सामन्यात केलेली कामगिरी कोणत्याही गोलंदाजाने केली नाही. शिवाय, वेगवान गोलंदाज अँडरसनने आपला 150 वा कसोटी सामना खेळत सेंच्युरियनच्या (Centurion) मैदानावर सामन्याचा पहिला चेंडू फेकला आणि संघाला पहिले यश मिळून दिले.

टॉस गमावल्यानंतर पहिले फलंदाजीअस्थी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा सलामी फलंदाज डीन एल्गर (Dean Elgar) याला पहिल्याच ओव्हरमध्ये अँडरसनचा सामना करावा लागला. पण, खराब फलंदाजीचे प्रदर्शन करत एल्गारने बॅट चालवली. बॉल त्याच्या बॅटच्या कडेला लागून विकेटकीपर जोस बटलर यांच्याकडे गेली, ज्याने चेंडू पकडून त्याला झेलबाद केले. दोन वर्षानंतर कसोटी सामन्याच्या पहिल्या चेंडूवर गोलंदाजीने विकेट घेतली. यापूर्वी, सुरंगा लखमलने केएल राहुलला बाद केले होते. शिवाय, या दशकात टेस्ट सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा अँडरसन हा पाचवा गोलंदाज बनला आहे. अँडरसन आणि लखमलऐवजी मिशेल स्टार्क आणि डेल स्टेन यांनी ही कामगिरी केली आहे. लखमलने या दशकात ही कामगिरी दोनदा 2010 आणि 17 मध्ये केली.

दरम्यान, 150 टेस्ट सामने खेळणारा अँडरसन हा नववा, तर इंग्लंडचा फक्त दुसरा क्रिकेटपटू आहे. इंग्लंडकडून यापूर्वी एलिस्टर कुक याने एकूण 161 टेस्ट सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम भारताच्या सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने 1989-2013 पासून एकूण 200 टेस्ट सामने खेळले आहेत.