SA vs AUS 1st T20I: ऑस्ट्रेलियाच्या एश्टन एगर ने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध घेतली हॅटट्रिक, ब्रेट ली नंतर 'ही' कमाल करणारा ठरला दुसरा गोलंदाज
एश्टन एगर (Photo Credit: Twitter/CricketAus)

जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात हॅटट्रिक घेत ऑस्ट्रेलियाचा (Australia) फिरकीपटू एश्टन एगर (Ashton Agar) ने शुक्रवारी रात्री एक मोठा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाच्या या फिरकी गोलंदाजाने दक्षिण आफ्रिकेच्या डावातील आठव्या ओव्हरमध्ये हा पराक्रम केला. त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस, एंडिल फेहलुकवाओ आणि डेल स्टेन यांना सलग तीन चेंडूवर बाद करून हॅटट्रिक पूर्ण केली. ड्यू प्लेसिसला डीपवर केन रिचर्डसनने झेलबाद केले, तर फेहलुकवाओला त्याने एलबीडब्ल्यूच्या जाळ्यात अडकवले आणि स्टेनला स्लिपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार आरोन फिंचकडे झेलबाद केले. यासह, एगर सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये हॅटट्रिक घेणारा दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे.

2007 मध्ये पहिल्या टी-20 च्या विश्वचषक स्पर्धेत बांग्लादेशविरुद्ध ब्रेट लीन (Brett Lee) ने ऑस्ट्रेलियाचा पहिली हॅटट्रिक घेतली होती. एगरने त्याच्या चार ओव्हरमध्ये 24 धावांवर5 बाद असे आकडे नोंदवले आणि दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 89 धावांनी ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात 107 धावांनी विजय मिळविला.

स्टीव्ह स्मिथ, जो 2018 बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर पहिल्यांदा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता त्याने कर्णधार फिंचच्या साथीने दुसर्‍या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली आणि शुक्रवारी वँडरर्स स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला6 बाद 196 अशी धावसंख्या उभारण्यास महत्वाची भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरची विकेट गमावल्यानंतर 27 चेंडूत 42 धावा आणि स्मिथने 32 चेंडूंत 45 धावा केल्या. मार्च 2018 नंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये स्मिथ आणि वॉर्नरसाठी शुक्रवारचा खेळ पहिला ठरला. त्यावर्षी केप टाऊनमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंगमुळे दोघांवर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वॉर्नर उपकर्णधार होता. दक्षिण आफ्रिकाकडून तबरेज शम्सी आणि स्टेनने प्रत्येकी 2 गडी बाद केले.