Rohit Sharma With his Daughter Samayra (Photo Credits: Instagram)

टीम इंडियाचा सलामीचा दमदार फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकप 2019 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आपल्या पहिल्याच खेळात रोहितने वन डे कारकिर्दीतील 23 वं शतक झळकावलंं आहे. रोहितला प्रोत्साहन देण्यासाठी आता त्याची पत्नी रितिका आणि चिमुकली समायरादेखील इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. काही वेळापूर्वीच रोहितने आपला पोस्ट मॅच रिकव्हरी   (Post Match Recovery)  बूमरँग व्हिडिओ शेअर केला आहे. ICC World Cup 2019 Time Table: लंडन व वॉल्स मधील क्रिकेट विश्वचषक 2019 ला सुरूवात; PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा 'आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप' चं संपूर्ण वेळापत्रक

रोहित शर्मा बूमरँग व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

Post match recovery 🥰

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

रोहित त्याच्या 5 महिन्याच्या समायरा सोबत काही मोकळा वेळ घालवत आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळताना रोहित शर्माने नवा विक्रम रचत पुन्हा त्याचा करिश्मा दाखवला आहे.  रोहित शर्मा याने मोडला सचिन तेंडुलकर याचा 'हा' विक्रम 

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना जिंकून टीम इंडिया सध्या काही वेळ आराम करत आहे. भारताचा विश्वकप 2019 मधील तिसरा सामना 13 जून दिवशी भारत विरूद्ध न्यूझिलंड होणार आहे.हा सामना ट्रेंटब्रीज, नॉटिंगहॅम येेेेथे होणार आहे. पहिला दक्षिण आफ्रिका त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया नंतर आता तिसरा सामना न्युझिलंडसोबत खेळत विजयाची हॅट्रिक ठोकण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ मैदानात उतरणार आहे. त्यामुळे टीम इंडियासोबत आता भारतीय क्रिकेट रसिकांचेही त्याकडे लक्ष लागलेले आहे.