वर्ष 2019 संपुष्टात आला आहे. आता विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याचे सहकारी 2020 ची तयारी करण्यात व्यस्त आहेत. 2019 मधील एकदिवसीय विश्वचषक सेमीफायनल फेरीमधील पराभव वगळता भारतीय क्रिकेटसाठी सर्व काही ठीक राहिले. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराटसह टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंनी बरेच रेकॉर्ड तोडले आणि बनवले. प्रत्येक वर्षाप्रमाणेच 2020 मध्येही बर्याच क्रिकेट मालिका खेळल्या जातील आणि यामध्ये सर्व भारतीय चाहत्यांचे लक्ष असेल ते रोहित आणि विराटच्या जोडीवर. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट आणि मर्यादित षटकारांचा कर्णधार रोहितसाठी वर्ष 2020 महत्त्वाचे आहे. नवीन वर्षात, सध्याच्या युगातील 'रन मशीन' आणि 'हिटमॅन' च्या निशाण्यावर बरेच मोठे रेकॉर्ड असतील. (Team India 2020 Schedule: नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात विराट सेना खेळणार 10 सामने, टीम इंडिया कधी कोणाबरोबर खेळणार, जाणून घ्या)
नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि टीम इंडिया 5 जानेवारीपासून श्रीलंकाविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्याच मैदानावर वनडे मालिकाही खेळायची आहे. यामध्ये टीम इंडियाचे हे दोन्ही फलंदाज रेकॉर्ड कामगिरी करू इच्छित असेल. इथे पाहूया आगामी वर्षात विराट आणि रोहित कोण-कोणते रेकॉर्ड मोडून इतिहास रचतील.
वनडेमध्ये सर्वाधिक षटकार
टीम इंडियाचा 'हिटमॅन' रोहित 2019 मध्ये पुन्हा एकदा षटकारांचा किंग बनला. रोहितने वनडेमध्ये आजवर 238 षटकार लागले आहेत आणि सर्वाधिक वनडे शतकारांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे. रोहितचे पुढे सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) 270, क्रिस गेल 331 आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी 315 षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे. रोहित आणि जयसूर्याच्या षटकारात फक्त 32 शतकारांचा फरक आहे. आणि जर रोहितने यंदा 32 पेक्षा जास्त षटकार लागले तर तो जयसूर्याला मागे टाकेल आणि यादीत तिसरे स्थान मिळवेल. टीम इंडियाला यंदा ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळायच्या आहेत.
विराट कोहलीची 50 वनडे शतकं
विराट कोहलीला सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून ओळखले जाते. 2019 मध्ये उत्कृष्ट धावा करणारा किंग कोहली पुढच्या वर्षी एक मोठा विक्रम नोंदवू शकतो. रन मशीन म्हणून ओळखला जाणारा कोहली 2020 मध्ये सचिन तेंडुलकर याचा वनडेमधील सर्वात मोठा विक्रम मोडू शकतो. वनडेमध्ये सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने आपल्या 463 वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक 49 शतकं केली आहेत. या यादीत 43 शतकांसह किंग कोहली दुसर्या क्रमांकावर आहे. यावर्षी सचिनचा हा विक्रम विराट मोडू शकतो आणि वनडेमध्ये 50 शतकं करणारा तो एकमेव क्रिकेटपटू बनू शकतो.
वनडेमध्ये मध्ये सर्वात जलद 12,000 धावा
वनडेमध्ये सर्वात वेगवान 12,000 धावा करण्याचा विक्रम सचिनच्याच नावावर आहे. सचिनने वनडेतील 300 डावांमध्ये 12,000 धावा पूर्ण केल्या. कोहलीने 233 डावात 11,609 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत कोहली 2020 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये 12,000 धावा पूर्ण करणारा वेगवान फलंदाज बनू शकतो.
एका वर्षात सर्वाधिक षटकार
वर्ष 2019 खऱ्या अर्थाने रोहितसाठी यशस्वी सिद्ध झाले. रोहितची आक्रमकता त्याच्या फलंदाजीतून दिसून येते आणि त्याने आपल्या खेळीत मोठे शॉट्स केले. रोहितने मागील वर्षी एकूण 77 षटकार लगावले आणि सलग तिसऱ्यांदा सर्वाधिक षटकार मारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मारला. रोहितने यापूर्वी 2018 मध्ये 74 आणि 2017 मध्ये 65 सर्वाधिक षटकार लगावले होते. यावर्षीही रोहित आपली जादू कायम ठेवत षटकरांचा नवीन रेकॉर्ड बनवेल यासाठी तो प्रयत्नशील असेल.
घरच्या मैदानावर खेळताना सर्वाधिक वनडे शतकं
वनडे क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर खेळताना सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने घरी खेळलेल्या 160 डावांमध्ये 20 शतकं केली आहेत. कोहली आपला आदर्श सचिनचा हा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आहे. घरच्या मैदानावर खेळत 89 डावात कोहलीने आजवर 18 शतकं केली आहेत. यावर्षी सचिनचा हा विक्रम कोहली मोडून आपल्या नावावर करू शकेल.
विराट आणि रोहितला यंदा अनेक मोठ्या संघाविरुद्ध टी-20 आणि वनडे मालिका खेळायच्या आहेत, त्यामुळे पुढील वर्षी टीम इंडियाचे हे दोन मोठे फलंदाज या पेक्षा अजून नवीन विक्रम मोडतील अशी अपेक्षा चाहते आणि आम्ही नक्कीच करतो.