Indian National Cricket Team Vs England National Cricket Team: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 साठी भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे. यानंतर टीम इंडिया घरच्या भूमीवर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियाचा भाग नसल्याचं सांगण्यात आलं आहे. रोहित-विराट व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील वनडे मालिकेत सहभागी होणार नाही. (हेही वाचा - Cricket Australia Men's Test Team 2024: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला कसोटी संघ निवडला, जसप्रीत बुमराहला बनवले कर्णधार, यशस्वी जैस्वालसह या खेळाडूंना मिळाले स्थान)
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी इंग्लंडविरुद्धची मालिका ही भारतासाठी शेवटची एकदिवसीय मालिका असेल, ज्यामुळे खेळाडूंना एकदिवसीय स्वरूपाचा सराव करण्याची संधी मिळेल. 22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध पांढऱ्या चेंडूची मालिका सुरू होणार असून, त्यामध्ये पहिली 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर 06 फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका सुरू होईल. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे दोघेही फक्त एकदिवसीय सामन्यांमध्येच खेळताना दिसतात, पण आता त्यावरही संकट आले आहे.
स्पोर्ट्स टाकवर प्रकाशित झालेल्या अहवालात एका सूत्राने सांगितले की, रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे त्रिकूट वर्कलोड मॅनेजमेंटमुळे इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभागी होणार नाही. याशिवाय बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे टी-20 मालिकेतही संघाचा भाग असणार नाही. मात्र, रोहित, विराट आणि बुमराहबाबत अधिकृत अपडेट्स येणे बाकी आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे
चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दुसरीकडे, टीम इंडियाची इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका १२ फेब्रुवारीला संपणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेल अंतर्गत होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे, मात्र टीम इंडियाचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. भारतीय संघ या स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचला तर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे सामनेही दुबईतच होतील.