बीसीसीआयने (BCCI) सोमवारी अगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या तीनही संघात भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे नाव न दिसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआयकडून देण्यात आले होते. त्यानंतर मुंबई इंडियन्सने पोस्ट केल आहे. या 45 मिनिटांच्या व्हिडिओत रोहित शर्मा तंदुरूस्त दिसत असून तो फटकेबाजी करत आहे. मग रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून का वगळले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यातच रोहित शर्माने आपल्या ट्विटर प्रोफाईलवरून इंडियन क्रिकेट नाव हटवून टाकल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे वैद्यकीय पथक रोहित शर्माच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे, असे बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी म्हटले आहे. जर तो दुखापतीतून बरे झाला तर, त्याला संघात समाविष्ट केले जाऊ शकते. तथापि, ऑस्ट्रेलिया दौर्यावर तो संघासह प्रवास करेल की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही, असेही ते म्हणाले आहेत. परंतु, ऑस्ट्रेलिया विरुद्ध रोहित शर्माचे रेकार्ड चांगले असून त्याला या दौऱ्यातून वगळल्यानंतर त्याच्या चाहत्यांसह माजी क्रिकेटरदेखील आश्चर्यचकीत झाले आहेत. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये रोहीत शर्माने ऑस्ट्रलिया विरुद्ध चांगली करुन दाखवली होती. परंतु, बीसीसीआयने रोहित अनफिट असल्याचे कारण देत त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळले. मुंबई इंडियन्स पोस्ट केलेल्या व्हिडिओत रोहीत शर्मा तंदुरूस्त असल्याचे दिसल्यानंतर चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. हे देखील वाचा- IPL 2020: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; कर्णधार रोहित शर्मा आयपीएल मधून बाहेर होण्याची शक्यता
रोहित शर्मा ट्विटर बायो-
ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यासाठी अखिल भारतीय ज्येष्ठ निवड समितीची सोमवारी व्हिडिओ-कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय तर, 4 कसोटी सामने खेळणार आहेत. दरम्यान, बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची घोषणा केली आहे.