आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 19 व्या रॉयल चॅलेंजर्स बंगळरू आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज ऐकमेकांशी भिडणार आहे. या हंगामात दोन्ही संघाने आतापर्यंत चांगले प्रदर्शन करुन दाखवले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडू श्रेयस अय्यर करत आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाचे कर्णधार पद भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली संभाळत आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ दुसऱ्या तर, बंगळरूचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या अनेकांना ड्रीम 11 गेमचे वेड लागल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे आजच्या सामन्यात कोणकोणत्या खेळाडूंची निवड करणे योग्य ठरेल? यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात ज्या डू प्लेसिस आणि शेन वाॉटसन यांनी निवड केली होती. ज्यामुळे त्यांना अधिक पॉईंट मिळाले होते. मात्र, बंगळरू आणि दिल्ली यांच्यातील सामन्यात कोणता खेळाडू चांगली कामगिरी करून दाखवणार? असा प्रश्न ड्रीम 11 गेम खेळणाऱ्यांना पडला आहे. हे देखील वाचा- RCB Vs DC, IPL 2020 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

ड्रीम 11 गेममध्ये खालील खेळाडूंची करू शकता निवड-

विकेटकीपर: एबी डिव्हिलियर्स, रिषभ पंत

फलंदाज: विराट कोहली, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, देवदत्त पडिककल

अष्टपैलू: मार्कस स्टोईनिस, वॉशिंग्टन सुंदर

गोलंदाज: कागिसो रबाडा, इसरू उदाना, युजवेंद्र चहल

संघ-

रॉयल चॅलेंजर्स बंगळरु: देवदत्त पद्यक्कल, आरोन फिंच, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), गुरकीरतसिंग मान, शिवम मावी, वॉशिंग्टन सुंदरखा इसरू उदाना, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, अ‍ॅडम जंपा.

दिल्लीची कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिमरोन हेटमेयर, मार्कस स्टोईनिस, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, कॅगिसो रबाडा, हर्षल पटेल, एनिर्च नॉर्टे.