RCB Vs DC, IPL 2020 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 19 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Royal Challengers Bangalore Vs Delhi Capitals) आज एकमेकांशी भिडणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे.

RCB Vs DC, IPL 2020 Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

RCB Vs DC 19th IPL Match 2020: आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 19 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Royal Challengers Bangalore Vs Delhi Capitals) आज एकमेकांशी भिडणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडू श्रेयस अय्यर करत आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाचे कर्णधार पद भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली संभाळत आहे. भारतीय वेळेनुसार, आज 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.

या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने एकूण 4 सामने खेळले असून त्यांनी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, एका सामन्यात पराभूत झाले आहेत. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळरूचा संघानेदेखील 4 सामन्यांपैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, एका सामन्यात पराभूत झाले आहेत. मात्र, रनरेटमुळे दिल्लीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या तर, बंगळरूचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ विजयी होणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. हे देखील वाचा- KXIP vs CSK आयपीएल 2020 सामन्यात जुळला गजब योगायोग; फाफ डु प्लेसिस-शेन वॉटसनच्या सलामी जोडीने रचला इतिहास, मोडला 7 वर्ष जुना रेकॉर्ड

संघ-

रॉयल चॅलेंजर्स बंगळरू:

आरोन फिंच, देवदत्त पद्धिकल, पार्थिव पटेल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत मान, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, ऍडम झंपा, इसरू उदाना, मोईन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

दिल्लीची कॅपिटल्स:

श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, अवेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, केमो पॉल, पृथ्वी शॉ, रविचंद्रन अश्विन, रिषभ पंत, संदीप लामिछाने, शिखर धवन, जेसन रॉय , समृद्ध नॉर्टजे, अ‍ॅलेक्स कॅरी, शिमरॉन हेटमीयर, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, मार्कस स्टोईनिस आणि ललित यादव.

(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2020 03:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).