RCB Beat MI , IPL 2020: सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाचा मुंबई इंडियन्सवर थरारक विजय
विराट कोहली (Photo Credit: Instagram)

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 10 व्या सामन्यातील सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने (Royal Challengers Bangalore) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) थरारक विजय मिळवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बंगळरूच्या संघाने 20 षटकांत मुंबईच्या संघासमोर 201 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईचा संघही 201 धावाच करू शकला. ज्यामुळे दोन्ही संघामध्ये सुपर ओव्हर खेळवण्यात आली होती. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघाने केवळ 7 धावा केल्या. या लक्ष्याचे पाठलाग करत बंगळरूच्या संघाने मुंबई इंडियन्सवर थरारक विजय मिळवला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळरू विरूद्ध सामन्यात नाणेफेक जिंकूण मुंबई इंडियन्सच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, एबी डिव्हीलियर्स आणि शिवम दुबे यांनी अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सविरुद्ध 201 धावांचा डोंगर तयार केला. बंगळुरुने दिलेल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सरुवात खराब झाली आहे. मुंबईने 100 धावांच्या आत आपले 4 फलंदाज गमावले होते. मात्र, इशान किशन आणि कायरन पोलार्डने मुंबईच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी तुफान फलंदाजी केली. परंतु, त्यांच्या प्रयत्नाला अपयश आले आणि हा सामना टाई झाला. हे देखील वाचा- Virat Kohli Trolled: मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात विराट कोहली याची निराशाजनक कामगिरी; सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल

आयपीएलचे ट्वीट- 

आयपीएलच्या पहिल्या नऊ सामन्यांनंतर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेमध्ये चौथ्या स्थानावर होता. तर, रॉयल चॅलेंजर्सचा संघ सातव्या स्थानावर होता. मात्र आजच्या सामन्यात विजय मिळवून रॉयल चॅलेंजर्सचा संघ थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर, मुंबई इंडियन्सच्या संघ पाचव्या स्थानावर घसरला आहे.