Virat Kohli Trolled: मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात विराट कोहली याची निराशाजनक कामगिरी; सोशल मीडियावर मजेशीर मीम्स व्हायरल
आरसीबी कर्णधार विराट कोहली (Photo Credit: PTI)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League 2020) तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवण्यात आहे. या हंगामातील दहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळरु आणि मुंबई इंडियन्स (RCB vs MI) यांच्यात सुरु आहे. या सामन्यात बंगळरूच्या संघाने मुंबईच्या संघासमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, आयपीएलच्या गेल्या अनेक हंगामात सर्वोकृष्ट कामगिरी करणारा विराट कोहली (Virat Kohli) आजच्या सामन्यातही मोठी धावसंख्या करण्यास अपयशी ठरला आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विराट कोहलीची खिल्ली उडवली जात आहे.

रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला होता. दरम्यान, गेल्या दोन सामन्यात निराशाजनक कामगिरी करणारा विराट कोहली आजच्या सामन्यात चांगली खेळी करुन दाखवेल, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, 202 लक्ष्याचे पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या विराट कोहलीने 9 चेंडूत 3 धावा करून बाद झाला. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरले असून याबाबत सोशल मीडयावर मजेशी मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत. हे देखील वाचा- IPL 2020 Orange Cap Holder List Updated: केएल राहुलचा फाफ डु प्लेसिसला 'दे धक्का', ऑरेंज कॅपवर केला कब्जा

ट्विट-

ट्विट-

ट्वीट-

ट्विट-

आयपीएलच्या पहिल्या नऊ सामन्यांनंतर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेमध्ये चौथ्या स्थानावर आहे. तर, रॉयल चॅलेंजर्सचा संघ सातव्या स्थानावर आहे. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्सचा संघ थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेणार आहे. तर, मुंबई इंडियन्सच्या संघ पाचव्या स्थानावर जाणार आहे.