वकार यूनुस (Photo Credit: Getty)

Youngest Captains in Cricket: क्रिकेट (Cricket) हा जगभरातील प्रसिद्ध खेळांपैकी एक आहे. अनेक देशांमध्ये क्रिकेटचे एका धर्माप्रमाणे अनुसरण केले जाते. आपल्या देशाच नेतृत्त्व करायला मिळणे खेळाडूसाठी हा मोठाच सन्मान असतो. काहींचे स्वप्न पूर्ण होते तर काहींची प्रतीक्षा करत कारकीर्द संपुष्टात येते. मात्र काही खेळाडूंना पुढे जाऊन संघाचे महत्वपूण पद म्हणजे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली जाते. तर खेळाडू ही जबाबदारी योग्यरीत्या पार पडतात तर काही फ्लॉप ठरतात. इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू बनले ज्यांनी तरुण वयातच नेतृत्वाची (Youngest Captains) धुरा हाती घेतली आणि वयाची 23 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. (Most Educated Cricketers: कोणी इंजिनीअर तर कोणी पोस्ट ग्रॅड्युएट, भारतीय संघाचे हे 5 खेळाडू मैदानाप्रमाणे अभ्यासातही होते हुशार)

1. राशिद खान (Rashid Khan)

बांग्लादेश विरोधात 2019 मधील एकमेव कसोटी सामन्यात राशिद खानने इतिहास रचला. चिट्टागोंग कसोटीत कसोटी सामन्यात राशिद कर्णधार म्हणून मैदानावर उतरताच जगातील सर्वात तरुण कर्णधार बनला. तेव्हा त्याचे वय 20 वर्ष 350 दिवस होते.

2. टटेन्डा तैबू (Tatenda Taibu)

तैबूने झिंबाब्वे संघाची धुरा 20 वर्ष आणि 358 दिवसांचे असताना सांभाळली. 6 मे, 2004 रोजी तो झिंबाब्वे संघाचा कर्णधार म्हणून श्रीलंकेविरुद्ध हरारे कसोटी सामन्यात उतरला. तैबूच्या नेतृत्त्वात झिंबाब्वेने एकूण 10 कसोटी सामने खेळले. ज्यातील 9 सामन्यात त्यांचा पराभव झाला तर 1 सामना अनिर्णित राहिला.

3. मन्सूर अली खान पतौडी (Mansur Ali Khan Pataudi)

पतौडी नवाब, मन्सूर अली खान पतौडी यांनी 23 मार्च 1962 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध भारताच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळली. पतौडी यांना जेव्हा कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली तेव्हा ते जगातील सर्वात तरुण कसोटी कर्णधार होते व हा विक्रम त्यांच्या नावावर 6 मे, 2004 पर्यंत राहिला.

4. वकार युनूस (Waqar Younis)

पाकिस्तानचे महान खेळाडू वकार युनूस यांचाही या एलिट यादीत समावेश आहे. युनूस यांनी 1993 मध्ये 22 वर्ष आणि 15 दिवसांचे असतानाच संघाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या हाती घेतली होती. कसोटी कर्णधार तेही गोलंदाज होणे तेव्हा छोटी गोष्ट नव्हती. विशेष म्हणजे तेव्हाच्या पाकिस्तान संघात इंजमाम उल हक, जावेद मियाॅंदाद, राशिद लतिफ, मुश्ताक अहमद व आमीर सोहेल यांसारखे दिग्गज खेळाडू भरले होते.

5. ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith)

कसोटी क्रिकेटचे सर्वात यशस्वी कर्णधार स्मिथ22व्या वर्षा दक्षिण आफ्रिकेसारख्या जगातील एका मोठ्या दक्षिण आफ्रिकी संघाचे नेतृत्व केले होते. सध्या ते या यादीत पाचव्या स्थानावर आहेत मात्र तेव्हा ते जगातील तिसरा सर्वात तरुण कर्णधार होते. स्मिथने 22 वर्षे आणि 82 दिवसांचा असताना ढाका कसोटीत 24 एप्रिल 2003 रोजी त्याने बांग्लादेशविरुद्ध पहिल्यांदा संघाची सूत्रे हाती घेतली होती.