काही महिन्यांच्या बंदीनंतर मुंबईचा (Mumbai) पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने घरगुती क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. पृथ्वीने पहिल्यांदा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिले दुहेरी शतक झळकावत आपला नवीन रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) हंगाम सुरू केला. डोपिंग उल्लंघनाच्या कारणास्तव आठ महिन्यांचे निलंबन पूर्ण करून क्रिकेटमध्ये परत आल्यानंतर, पृथ्वीने घरगुती क्रिकेटमधील उल्लेखनीय फलंदाजी करत सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन केले. रणजी ट्रॉफी 2019-20 स्पर्धा नुकतीच मागील सोमवारी (9 डिसेंबर) सुरू झाली आहे. यात पृथ्वीच्या मुंबई संघाचा पहिला सामना बडोद्या (Baroda) विरुद्ध वडोदरामध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या डावात शॉने 62 चेंडूत 66 धावा केल्या. पण त्याच्या दुसर्या डावातील फलंदाजी अधिक अविश्वसनीय ठरली. पहिल्या डावात मुंबईने 431 धावा केल्या, तर बडोदा 307 धावांवर ऑल आऊट झाला आणि सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात मुंबईने 124 धावांची आघाडी मिळविली. (Ranji Trophy 2019-20: मेघालयचा अष्टपैलू संजय यादव याची विक्रमी खेळी, डेब्यू मॅचमध्ये घेतल्या 9 विकेट)
पृथ्वीने दुसर्या डावात सामर्थ्याने सुरुवात केली. 20 वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाजाने प्रथम अवघ्या 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि 84 चेंडूत शतक केले. शॉने आपला डाव 146 चेंडूंमध्ये 150 धावांवर खेचला आणि लवकरच त्याने आपल्या आधीच्या प्रथम श्रेणीच्या 188 धावांची खेळी मागे टाकली. अखेर टीम इंडियाच्या या युवा फलंदाजाने अवघ्या 174 चेंडूत प्रथम श्रेणीतील पहिले दुहेरी शतक पूर्ण केले. पण, 179 चेंडूत 202 धावा केल्यावर पृथ्वीने विकेट गमावली. बाद होण्यापूर्वी शॉने 19 चौकार आणि 7 षटकार लगावले. दरम्यान, गेल्या 25 वर्षात भारतीय घरगुती संघांसाठी पृथ्वीने सर्वात जलद प्रथम श्रेणीत दुहेरी शतक केले. यापूर्वी, श्रेयस अय्यर याने 2015 मध्ये मुंबईसाठी 175 चेंडूत, रोहित शर्मा याने 2009 मध्ये 185 चेंडूत आणि सचिन तेंडुलकर याने 1998 मध्ये 188 चेंडूत ही कामगिरी बजावली होती.
Fastest first-class 200s for Indian domestic teams in last 25 years (by balls):-
174 - Prithvi Shaw for Mumbai, today
175 - Shreyas Iyer for Mumbai, 2015
185 - Rohit Sharma for Mumbai, 2009
188 - Sachin Tendulkar for Mumbai, 1998 (tour match v AUS)
— Kausthub (@kaustats) December 11, 2019
बंदी संपल्यानंतर पृथ्वीवर सुरू असलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) मध्ये पाच सामने खेळले. या स्पर्धेतही पृथ्वीने सातत्यपूर्ण कामगिरी करत 63, 30, 64, 30, 53 अश्या धावांची नोंद केली. शॉने 48.00 च्या सरासरीने एकूण 240 धावा केल्या. रणजी करंडक स्पर्धेत पृथ्वीनेत्याचा फॉर्म कायम ठेवला आहे परंतु आणखी धोकादायकप्रकारे.