मेघालयचा (Meghalaya) फलंदाज अष्टपैलू संजय यादव (Sanjay yadav) याने गळवारी सोवियातील नागालँड (Nagaland) क्रिकेट स्टेडियमवर नागालँडविरुद्ध नऊ विकेट्स घेऊन रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) मध्ये एका रेकॉर्डची नोंद केली आहे. नोव्हेंबरमध्ये यंदाच्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत मेघालयच्या मुंबईविरुद्ध जबरदस्त विजय मिळविणारा प्रमुख डावखुरा ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाज संजयने नागालँडविरुद्ध मॅचमध्ये 22 ओव्हरमध्ये 7 मेडन आणि 52 धावा देत 9 गडी बाद केले. 24-वर्षीय यादव पाहुणा म्हणून 2019-20 हंगामाच्या आधी तामिळनाडूहून मेघालय क्रिकेट संघात दाखल झाला. प्रथम श्रेणी पदार्पणाच्या सामन्यात खेळाडूने खेळली ही 7 वी उत्कृष्ट, तर भारतीयाकडून तिसरी सर्वोत्कृष्ट खेळीची संजयने नोंद केली आहे. यापूर्वी वसंत रांजणे आणि अमरजित सिंह याने सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची नोंद केली आहे. रांजणेने 1956-57 मध्ये महाराष्ट्र्र आणि सौराष्ट्रविरुद्ध मॅचमध्ये 9/35 आणि अमरजितने केरळ आणि आंध्र मॅचमध्ये 9/45 संख्येची नोंद केली आहे. (Ranji Trophy 2019-20: वसीम जाफर याने रचला इतिहास, रणजी ट्रॉफीमध्ये 150 सामने खेळणारा बनला पहिला खेळाडू)
संजयने 24 सप्टेंबर रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि सोमवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश केला. सोमवारी, गोलंदाजांच्या आणखी एक शानदार कामगिरीमध्ये, रेक्स सिंह याने मणिपूरसाठी 22 धावांत 8 गडी बाद केले. मिझोरमविरुद्ध शानदार गोलंदाजी करत त्याने संपूर्ण संघाला फक्त 65 धावांवर ऑल आऊट करण्यास महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, पहिले फलंदाजी करणाऱ्या मेघालयसाठी संजयने फलंदाजीत 61 धावांचे योगदान दिले. तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) मध्ये वीबी तिरुवल्लुर वीरन्स (आताच्या व्हीबी कांची वीरन्स) साठी यादवच्या कामगिरीमुळेने त्याला 2017 आयपीएल लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) 10 लाखात खरेदी केले.
मेघालय पहिल्या डावात 285 धावांवर ऑल आऊट झाला. याच्या प्रत्युत्तरात संजयच्या 9 विकेटच्या जोरावर मेघालयने नागालँडला पहिल्या डावात 136 धावांवर रोखले. दुसऱ्या डावात संजय काही कमाल करू शकला नाही. तो फक्त 1 धावावर माघारी परतला. मेघालायने दुसऱ्या डावात 89 धावांवर 9 गडी गमावले आहेत.