रमाकांत आचरेकर यांच्या अंत्यसंस्काराला सचिन तेंडुलकर, राज ठाकरे यांची हजेरी
Ramakant Achrekar last rites ( Phto Credits : Twitter)

Ramakant Achrekar Last Rites : भारतीय क्रिकेट विश्वामध्ये 'भीष्माचार्य' म्हणून ओळख असलेले रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar) यांचे काल वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)सोबत विनोद कांबळी (Vinod Kambli), अजित आगरकर (Ajit Agarkar) , प्रविण आमरे(Pravin Amre) यांना घडवण्यात आचरेकर सरांचा मोठा वाटा होता. आज आचरेकरांवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.  शिवाजी पार्क या आचरेकरांच्या राहत्या घरी राज ठाकरे, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. आचरेकर यांच्या निधनामुळे उत्तमोत्तम खेळाडूंची देणगी देणारा श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला : मुख्यमंत्री

सचिनची भावुक प्रतिक्रिया

सचिन तेंडुलकरच्या जडणघडणीमध्ये रमाकांत आचरेकर यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सचिन तेंडुलकर, अजित आगरकर यांनी रात्रीच त्यांच्या कुटुंबीयांना भेटून सात्वंन केले. ट्विटरच्या माध्यमातून सचिनने त्याच्या आचरेकर सरांबद्दलच्या भावना मोकळ्या केला.

रमाकांत आचरेकर यांचा  पद्मश्री आणि द्रोणाचार्य या सन्मानाने गौरव करण्यात आला आहे.