IPL 2025 (Photo Credit - X)

मुंबई: भारत-पाकिस्तान (IND vs PAK) यांच्या वाढच्या तणावामुळे बीसीसीआयने (BCCI) एका आठवड्यासाठी आयपीएल 2025 स्थगित केले होते. दरम्यान, भारत-पाकिस्तानमधील वातावरण थोडेफार शांत झाले असुन चाहत्यांकडून आयपीएल पुन्हा कधी सुरु होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, आयपीएल 2025 चे नवीन वेळापत्रक कधी येणार या बाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी नवीन माहिती दिली आहे. (हे देखील वाचा: IPL 2025 पुन्हा सुरू होण्यापूर्वी RCB ला मोठा धक्का? मुख्य खेळाडू बाहेर जाण्याची शक्यता)

राजीव शुक्लाने दिली मोठी अपडेट

रविवारी पत्रकारांशी बोलताना राजीव शुक्ला यांनी आयपीएल 2025 बद्दल सांगितले की, "आतापर्यंत बीसीसीआयने कोणताही निर्णय घेतलेला नाही. परंतु बीसीसीआयचे अधिकारी त्यावर वेगाने काम करत आहेत. ही स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली होती. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आहे. आता ही स्पर्धा लवकरच सुरू होईल."

आयपीएल 2025 'या' तीन ठिकाणी होऊ शकते

भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर बीसीसीआयने आयपीएल एका आठवड्यासाठी पुढे ढकलले. खरंतर, धर्मशाला येथे पंजाब आणि दिल्ली यांच्यात सामना सुरू होता आणि नंतर पहिल्या डावातील 10.1 षटकांनंतर सामना थांबवण्यात आला. आता आयपीएलच्या अंतिम सामन्यासह 17 सामने शिल्लक आहेत, जे बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद या तीन ठिकाणी खेळवता येतील.

या दिवशी सुरु होऊ शकते आयपीएल

आम्ही तुम्हाला सांगतो की आयपीएल 2025 लवकरच पुन्हा सुरू होऊ शकते. बीसीसीआय 16 किंवा 17 मे रोजी आयपीएल पुन्हा सुरू करू शकते. तथापि, बीसीसीआयला ही स्पर्धा 30 मे पर्यंत संपवायची आहे आणि जर तसे झाले तर आयपीएलमध्ये डबल हेडर सामने पाहता येतील.