PM Modi And Team India (Photo Credit - X)

PM Modi Meet Team India Programme: टी-20 विश्वचषक 2024 ची चॅम्पियन टीम इंडिया (Team India) लवकरच भारताच्या भूमीत पोहोचणार आहे. टीम इंडियाने बार्बाडोसहून भारतासाठी उडान घेतले आहे. बीसीसीआयने (BCCI) संघासाठी एअर इंडियाच्या विशेष विमानाची व्यवस्था केल्याचे सांगण्यात येत आहे. 29 जून रोजी खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर बार्बाडोसमध्ये जोरदार वादळ निर्माण झाले होते, त्यामुळे संघाला परतणे शक्य झाले नव्हते. पण आज हे विमान बार्बाडोसहून भारतीय वेळेनुसार 1 वाजण्याच्या सुमारास टेकऑफ झाले असून ते गुरुवारी सकाळी भारतात पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे येथे आल्यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू आणि कर्मचारी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) भेटतील, त्याचे वेळापत्रक आता समोर आले आहे.

गुरुवारी सकाळी टीम इंडिया ट्रॉफीसह भारतात पोहोचेल

आत्तापर्यंत समोर आलेल्या बातम्यांवरून असे समोर आले आहे की, संपूर्ण टीम इंडिया बार्बाडोसहून स्पेशल फ्लाइटने निघून गुरुवारी सकाळी 7 ते 8 च्या सुमारास थेट दिल्लीला पोहोचेल. आता मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदींची भारतीय संघाला भेटण्याची वेळ सकाळी 11 वाजता निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी सर्व भारतीय खेळाडूंना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करतील. माहितीनुसार ते प्रत्येक खेळाडूंचा सन्मान करु शकतात. (हे देखील वाचा: Rishabh Pant Shares Emotional Post: T20 विश्वचषक विजेतेपद जिंकल्यानंतर ऋषभ पंतने एक भावनिक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली, म्हणाला - God has it’s own plan)

टीम इंडियाची मुंबईत निघू शकते विजयी मिरवणूक?

टीम इंडियाच्या पुढील वेळापत्रकाबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, मात्र त्यानंतर भारतीय संघ थेट मुंबईला रवाना होईल, असे मानले जात आहे. यानंतर, मुंबईत एका ओपनडेक बसमध्ये रोड शो होईल, ज्यामध्ये भारतीय खेळाडू टी-20 विश्वचषक ट्रॉफीसह दिसतील. यामध्ये देशवासियांना त्याला पाहता येईल आणि त्यांना प्रोत्साहन देण्याची संधीही मिळेल. टीम इंडियाने तब्बल 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे.