Panga Kyu Le Raha Hai! रोहित शर्मा बरोबर रिषभ पंतला करायची मोठे षटकार मारण्याची स्पर्धा, हिटमॅनची प्रतिक्रिया पाहून हसून व्हाल लोटपोट, पाहा Video
रिषभ पंत आणि रोहित शर्मा (Photo Credit: Getty Images)

कोरोना विषाणूमुळे (Coronavirsu) सध्या क्रिकेटसह सर्व खेळ बंद झाले सलते तर सर्व क्रिकेटर्स त्यांच्या चाहत्यांशी एकप्रकारे जोडलेले आहेत. बुधवारी टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि भारताचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) इंस्टाग्रामवर लाईव्ह चॅट करताना दिसले. त्यांच्या या लाईव्ह चॅटचा चाहत्यांनाही आनंद लुटला. चर्चेदरम्यान दोन्ही खेळाडूंनी एकमेकांबद्दल आणि नंतर इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 वरही चर्चा केली. दोघे दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सकडून खेळतात. आयपीएलची सुरुवात 29 मार्चपासून होणार होती, पण कोरोनाचा भारतात आणि जगभर होणार प्रसार पाहता बीसीसीआयने स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत स्थगित केली. आणि आजकाल काही करण्यासाठी नसल्याने क्रिकेटपटू सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधण्याची संधी शोधत आहेत. यापूर्वी रोहित युजवेंद्र चहल आणि केविन पीटरसनबरोबर इंस्टाग्रामवर लाईव्ह होता. आणि बुधवारी त्याने बुमराहसोबत लाईव्ह चॅट केलं. (COVID-19 Outbreak: लॉकडाउनमध्ये दिसला रिषभ पंतचा वेगळा अंदाज, अशाप्रकारे ठेवत आहे स्वत:ला व्यस्त)

या लाईव्ह चॅटचा सर्वात मजेदार क्षण तेव्हा आला जेव्हा बुमराहने रोहितला सांगितले की रिषभ पंत (Rishabh Pant) त्याला चॅलेंज देऊ इच्छित आहे. पंतने रोहितला सर्वात मोठे षटकार ठोकण्याचे आव्हान केले. यानंतर रोहितने पंतची बोलती बंद केली आणि म्हणाला, 'संघात येऊन एक वर्ष नाही झालं आणि मला आव्हान देत आहे.' रोहितचे हे उत्तर ऐकून बुमराहलाही हसू अनावर झाले. पाहा हा व्हिडिओ:

दरम्यान, रोहितने न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेनंतर कोणताही स्पर्धात्मक मालिका किंवा खेळ खेळला नाही. किवी टीमविरुद्ध अखेरच्या सामन्यात रोहितला दुखापत झाल्याने त्याला वनडे आणि टेस्ट मालिकेतून माघार घ्यावी लागली. आणि या दोन्ही मालिकेत भारताला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. त्याच्या अनुपस्थितीत पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवालच्या जोडीला प्रभावी खेळ करण्यास अपयश आले. बुमराहही अखेर न्यूझीलंड दौऱ्यावर खेळला होता.