भारत (India) आणि पाकिस्तानची (Pakistan) क्रिकेटच्या मैदानावरील टक्कर कुणापासून लपलेली नाही. सध्या असलेल्या तणावपूर्ण संबंधांमुळे भारताने पाकिस्तानशी द्विपक्षीय क्रिकेट संबंध संपुष्टात आणले आहेत. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी (Ehsan Mani) यांनी पुन्हा एकदा बालिश विधान केले आहे. मनी म्हणाले की पाकिस्तानपेक्षा भारत क्रिकेट खेळण्यापेक्षा अधिक असुरक्षित आहे. बीसीसीआयनेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Pakistan Cricket Board) अध्यक्षांच्या या टिप्पणीवर पलटवार करत त्यांची बोलती बंद केली आहे. कराची येथे श्रीलंकाविरुद्ध कसोटी मालिका संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मणी म्हणाले, 'आम्ही हे सिद्ध केले आहे की पाकिस्तान सुरक्षित आहे. इथे कोणी येत नसेल तर त्यांनी हे सिद्ध करावे की पाकिस्तान असुरक्षित आहे. सध्या पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यापेक्षा जास्त असुरक्षित भारत खेळणे आहे. ते म्हणाले की आता कोणीही पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करू नये. (श्रीलंका, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी शिखर धवन, जसप्रीत बुमराह टीम इंडियात सामिल; रोहित शर्मा, मोहम्मद शमी यांना टी-20 साठी विश्रांती)
हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी मणींच्या टिप्पणीला उत्तर देताना सांगितले, "बहुतेक वेळा लंडनमध्ये राहणारी व्यक्तीने भारतातील सुरक्षेबद्दल भाष्य करणे योग्य नाही. ते तर पाकिस्तानच्या सुरक्षेबाबत बोलण्यासाठीदेखील योग्य नाही. मुश्किलीने ते पाकिस्तानात राहतात. जर त्यांनी पाकिस्तानमध्ये जास्त वेळ घालवला तर वास्तविक परिस्थिती कशी आहे हे त्याला कळेल."
BCCI Vice President Mahim Verma on Pakistan Cricket Board Chief's reported statement 'India a far greater security risk than Pakistan’: They should first look within and think about their own country. We are capable enough to handle our country and security. pic.twitter.com/33QOhVh0bJ
— ANI (@ANI) December 24, 2019
तब्बल दहा वर्षांनंतर श्रीलंका संघासह पाकिस्तानमध्ये कसोटी क्रिकेट परतला. श्रीलंका संघाच्या दौर्यासह, दहा वर्षानंतर कसोटी क्रिकेट पाकिस्तानमध्ये परतले आहे. 2009 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोणताही संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी गेला नव्हता. आणि आता बांग्लादेश संघ जानेवारीमध्ये पाकिस्तानचा दौरा करणार आहे, परंतु या दौर्यावर अजून संभ्रम आहे. यावर पीसीबी अध्यक्ष मणी म्हणाले की आम्ही बांग्लादेश बोर्डाशी संपर्कात आहोत. केवळ बांग्लादेशच नाही तर सर्व संघांना पाकिस्तान घरच्या मालिका पाकिस्तानमध्ये आयोजित करणार यात शंका नाही.