IND vs PAK (Photo Credit - Twitter)

या वर्षी होणाऱ्या आशिया चषक (Asia Cup 2023) आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (ODI World Cup 2023) भारत-पाकिस्तान आमनेसामने (IND vs PAK) आहेत. आशिया चषकासाठी भारताला पाकिस्तानात जायचे नसतानाच पाकिस्तानने एकदिवसीय विश्वचषकासाठीही अट घातली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नजम सेठी (Nazam Sethi) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) चेअरमन ग्रेग बार्कले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ अलर्डिस यांना सांगितले आहे की पाकिस्तान संघ अहमदाबादमध्ये वर्ल्डकपचे सामने खेळणार नाही. (हे देखील वाचा: IND vs AUS, WTC Final 2023: फायनलमध्ये भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ हातात काळ्या पट्ट्या बांधून उतरले मैदानात, जाणून घ्या काय आहे कारण)

चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता यांना दिले प्राधान्य 

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने पीसीबीच्या एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, सेठी यांनी आयसीसी अधिकार्‍यांना स्पष्ट केले आहे की अंतिम सामना असल्याशिवाय पाकिस्तान वर्ल्डकपदरम्यान अहमदाबादमध्ये खेळणार नाही. पीटीआय कडून सांगितले- “सेठी यांनी बार्कले आणि अॅलार्डीसला सांगितले आहे की फायनलसारखा नॉक-आउट सामना असल्याशिवाय त्यांचे सामने अहमदाबादमध्ये व्हावेत असे पाकिस्तानला वाटत नाही.” मीडिया रिपोर्टनुसार, सूत्राने सांगितले की, “त्याने आयसीसीला विनंती केली की, जर राष्ट्रीय संघाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जागतिक स्पर्धेसाठी भारतात जाण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून परवानगी मिळाली तर ते चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे सामने खेळायला आवडेल.”

आयसीसी घेणार मध्यस्थीची भूमिका

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हवा आहे. मात्र, या जागेबाबत पीसीबीचा आक्षेप आहे. आयसीसी प्रमुख सेठी यांची भेट घेण्यासाठी गेल्या आठवड्यात लाहोरला गेले होते. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या आगामी विश्वचषकात पाकिस्तानच्या सहभागाबाबत आश्‍वासन मागताना आयसीसीच्या शिष्टमंडळाने पीसीबी आणि बीसीसीआय यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावण्याचे संकेत दिले आहेत. आशिया चषकाबाबत या महिन्याच्या अखेरीस निर्णय अपेक्षित आहे.