
India National Cricket Team vs Pakistan National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना रविवारी म्हणजे 23 फेब्रुवारी रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs PAK) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या पाचव्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात गडी राखुन पराभव केला आहे. एकीकडे, टीम इंडियाने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. तर सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करल्याने पाकिस्तान स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडला आहे. याआधी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने भारतासमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 42.3 षटकात लक्ष्य गाठले.
CT 2025. India Won by 6 Wicket(s) https://t.co/llR6bWz3Pl #PAKvIND #ChampionsTrophy
— BCCI (@BCCI) February 23, 2025
तत्तपुर्वी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि संपूर्ण संघ 242 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून सौद शकीलने 76 चेंडूत सर्वाधिक 62 धावा केल्या. याशिवाय मोहम्मद रिझवानने 77 चेंडूत 46 धावांची खेळी केली. बाबर आझमला 26 चेंडूत फक्त 23 धावा करता आल्या. शेवटी, खुसदिल शाहने 39 चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने 36 धावा केल्या. दुसरीकडे, टीम इंडियाकडून कुलदीप यादवने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव व्यतिरिक्त हार्दिक पंड्याने दोन विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातही निराशाजनक झाली आणि केवळ 31 धावांवर असताना कर्णधार रोहित शर्माच्या रूपात संघाला पहिला मोठा धक्का बसला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर, उपकर्णधार शुभमन गिल आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी मिळून डावाची जबाबदारी घेतली आणि संघाचा धावसंख्या 100 धावांपर्यंत पोहोचवली. (हे देखील वाचा: Virat Kohli Completed Fastest 14000 ODI Runs: विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यात केल्या 14,000 धावा पूर्ण, सचिनचा विक्रम काढला मोडीत)
टीम इंडियाने 42.3 षटकांत फक्त चार विकेट गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी, महान फलंदाज विराट कोहलीने नाबाद 100 धावांची सर्वात स्फोटक खेळी खेळली. या धमाकेदार खेळीदरम्यान, विराट कोहलीने 111 चेंडूत सात चौकार मारले. विराट कोहली व्यतिरिक्त श्रेयस अय्यरने 56 धावा केल्या.
त्याच वेळी, अनुभवी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने पाकिस्तान संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. शाहीन आफ्रिदी व्यतिरिक्त खुसदिल शाह आणि अबरार अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. टीम इंडियाचा पुढील सामना 2मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध होईल.