
Pakistan vs New Zealand 3rd T20I: पाकिस्तान संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता मालिकेतील तिसरा सामना 21 मार्च रोजी ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळला जाईल. ज्याचा वेळ आता बदलला आहे. आतापर्यंत मालिकेतील पहिले दोन सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 6.45 वाजता खेळले होते.
तिसऱ्या टी-20 सामन्याची वेळ बदलली
टी-20 मालिकेतील तिसरा सामना 21 मार्च रोजी खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11.45 वाजता सुरू होईल. याचा अर्थ तिसरा सामना आता 5 तासांच्या विलंबाने सुरू होईल. त्याशिवाय मालिकेतील उर्वरीत चौथा आणि पाचवा सामना देखील एकाच वेळी खेळवला जाईल.
भारतात तुम्ही सामना कुठे पाहू शकता?
पाकिस्तान-न्यूझीलंड सामना पहायचा असेल तर तुम्ही तो स्टार स्पोर्ट्सवर नाही तर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. याशिवाय, सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अॅपवर असेल.
या टी-20 मालिकेत पाकिस्तान आणि न्यूझीलंड दोन्ही संघ नवीन कर्णधारांसह खेळत आहेत. पाकिस्तानचे नेतृत्व सलमान अली आगा करत आहेत, तर न्यूझीलंडचे नेतृत्व मायकेल ब्रेसवेल करत आहेत.