(Photo Credit: Instagram/sachintendulkar)

व्हॅलेंटाईन डेला (Valentine's Day) प्रेमाचा दिवस म्हणतात आणि प्रत्येकजण ज्याला प्रेम करतो तो त्या विशिष्ट व्यक्तीबरोबर घालवायचा असतो. 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे जगभरात साजरा केला जातो. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) माजी फलंदाज आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने वेलेंटाइन डेनिमित्त त्याच्या चाहत्यांना त्याच्या पहिल्या प्रेमाची जाणीव करून दिली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करताना सचिनने त्याचे पहिले प्रेम काय आहे ते सांगितले आहे. क्रिकेट आणि विशेषत: स्ट्रेट ड्राईव्ह अजूनही सचिनचे पहिले प्रेम आहे, जर काही शंका मनात असेल तर सचिनने त्यांना स्वतः मिटवून टाकले. प्रेमाच्या या दिवशी सचिनने फलंदाजीच्या सरावाचा व्हिडिओ “माझे पहिले प्रेम” या कॅप्शनसह शेअर केला. (Valentine's Day Special 2020: वयाने 10 वर्षे मोठी आणि 2 मुलींची आई आयशाला पाहून पडली गब्बर शिखर धवन याची विकेट, फेसबुकवर झाला प्रेमाचा टॉस)

सचिनच्या फलंदाजीच्या सत्राचा तो व्हिडिओ सिडनीचा होता जिथे त्याला ऑस्ट्रेलियातील बुशफायर पीडितांसाठी निधी गोळा करण्यासाठी खेळवण्यात आलेल्या बुशफायर क्रिकेट बॅश सामन्यात रिकी पॉन्टिंग इलेव्हन संघाचा प्रशिक्षक म्हणून बोलविण्यात आले होते. मास्टर ब्लास्टरचे पहिले प्रेम अजूनही क्रिकेट आहे आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा तो बॅट हातात पकडण्याची संधी सोडत नाही. आजही त्याने असेच काही केले. पाहा हा व्हिडिओ:

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 7 वर्षांपूर्वी निवृत्त होऊनही सचिन अजूनही क्रिकेट खेळण्यापासून मागे हटत नाही आणि स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यास सज्ज असतो. नुकताच ऑस्ट्रेलियाच्या बुशफायर पीडितांच्या मदतीसाठी खेळवण्यात आलेल्या सामन्याच्या एका डावाच्या ब्रेकनंतर सचिनने तब्बल पाच वर्षानंतर हातात बॅट पकडली आणि ऑस्ट्रेलियाची दिग्गज महिला गोलंदाज एलिसे पेरी हीचा एक ओव्हरमध्ये सामना केला होते. सचिनने या ओव्हरमध्ये जोरदार चौकार मारले होते. आजवरचा महान फलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्‍या सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विक्रमी धावा केल्या आहेत. त्याने वनडेत 8,426 आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 15,921 धावा केल्या आहेत. तो आता इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीचा सल्लागार आहे.