Valentine's Day Special 2020: वयाने 10 वर्षे मोठी आणि 2 मुलींची आई आयशाला पाहून पडली गब्बर शिखर धवन याची विकेट, फेसबुकवर झाला प्रेमाचा टॉस
शिखर धवन आणि आयशा मुखर्जी (Photo Credit: Instagram)

Valentine's Day Special 2020: 14 फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हणतात आणि त्याची सुरुवात झाली आहे. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही विशेष दिवसाची, प्रसंगी किंवा वेळेची आवश्यकता नसली तरी व्हॅलेंटाईन डे चे प्रेमी जोडप्यांमध्ये खास महत्व आहे. प्रेमात वयाची मर्यादा नसते असे म्हणतात आणि क्रिकेट विश्वातील या प्रसिद्ध जोडप्याने हे सिद्ध देखील करून दाखवले आहे. टीम इंडियाचा 'गब्बर' शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी (Ayesha Mukherjee) यांची प्रेमाची कहाणी ही अशीच आहे. दोघांनी लग्नाला सात वर्ष झाली असली तरीही त्यांची केमिस्ट्री अप्रतिम आहे की असे वाटते जणू आत्ताच काही दोघांच्या लग्न झाले आहे. हे जोडपं बहुतेक फोटोंमध्ये नेहमीच एकसाथ आनंदी दिसतात. आजकाल काळात अनेक जणांना त्याच्या जीवनाचा साथीदार सोशल मीडियावरच मिळाला आहे. शिखर आणि आयशाबाबतही असेच घडले. धवन आणि हरभजन सिंह फेसबुक पाहत असताना त्यांनी आयशाला पहिले आणि मग काय गब्बरची विकेटच पडली.

पण, दोघांचे एकत्र येणे एवढे सोप्पे नव्हते. आयशाला फेसबुकवर पाहताच शिखरने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली, पण ऑस्ट्रेलियन बॉक्सर आयशा त्याची रिक्वेस्ट मान्य करेल असा विचारही त्याने केला नाही. रिक्वेस्ट पाठवत आयशानेने मान्य केली. दोघांमध्ये हळूहळू बोलणे सुरु झाले आणि दोघांमध्ये मैत्री झाली. दोघांमध्ये प्रेम कधी फुलले हे कळलेच नाही. ती आपल्यापेक्षा 10 वर्ष मोठी आहे आणि 2 मुलींची आई आहे हे सर्व माहित असतानाही धवनने लोकांची पर्वा केली नाही आणि तिला लग्नाचा प्रस्ताव दिला. आयशाने तो मान्य केला, पण लग्नासाठी थोडा वेळ मागितला. यानंतर जेव्हा धवनच्या कुटुंबाला कळले तेव्हा त्यांनी दोघांच्या लग्नासाठी सुरुवातीला मनाई केली, पण शिखरने त्यांची मनधरणी केली.

शिखर आणि आयशा मुखर्जीचा 2009 मध्ये साखरपुडा झाला आणि 30 ऑक्टोबर 2012मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले. शिखरसह आयशाने 2014 मध्ये जोरवार नावाच्या मुलाला जन्म दिला. यापूर्वी आयशाचे एका व्यापारीसोबत लग्न झाले होते आणि त्यांना रिया आणि आलिया अशा दोन मुलीही आहेत. शिखरने आयशाला तिच्या मुलींसोबत स्वीकारले आणि आज तो अनेकदा सोशल मीडियावर त्यांना स्वतःची मुलगी म्हणूनही संबोधले आहेत.