कपिल देव (Photo Credit: Getty)

भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे देश आणि दुनियाचे प्रसिद्ध अष्टपैलू कपिल देव (Kapil Dev) यांनी पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध, 16 ऑक्टोबर 1978 दिवशी फैसलाबाद येथे टेस्ट क्रिकेटची सुरुवात केली होती. पण, देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या या भारतीय कर्णधाराच्या आंतराष्ट्रीय टेस्ट करिअरची सुरुवात तितकी संस्मरणीय नव्हती. देवने 19 व्या वर्षी पहिला कसोटी सामना खेळला होता. तो सामना अनिर्णित राहिला, मात्र कपिलची सामन्यांची आकडेवारी इतके प्रभावी नव्हते ज्याला पाहून. हा क्रिकेटपटू आगामी काळात भारतीय क्रिकेटला अनेक सुवर्ण दिवस देणार असे म्हणता येईल. बिशन सिंह बेदी (Bishan Singh Bedi) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ फैसलाबादमध्ये खेळायाला उतरला. पहिले फलंदाजी करत पाकिस्तानने पहिला डाव 503 धावांवर कपिलने 16 ओव्हर टाकले आणि 71 धावा दिल्या. देवने त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 600 पेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत, पण टेस्ट पदार्पणाच्या सामन्यात त्यांना एकही विकेट मिळाली नाही. (Conflict Of Interest च्या नोटीसनंतर कपिल देव यांच्याकडून बीसीसीआय क्रिकेट सल्लागार समितीच्या प्रमुखपदावरून राजीनामा)

पाकिस्तानने डाव घोषित केल्यावर भारताने फलंदाजी करत 462 धावा केल्या. यात गुंडप्पा विश्वनाथ यांनी सर्वाधिक 145 धावांची खेळी केली होती. जेव्हा देवची बॅटिंगची वेळ आली तेव्हा त्यांना फलंदाजीने देखील काही खास करता आले नाही, आणि मुश्ताक अहमद याच्या गोलंदाजीवर केवळ 8 धावा करून बाद झाले. पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या डावात कपिलने 12 ओव्हर टाकले 25 धावा देत यावेळी 1 गडी बाद केला. पाकिस्तानने दुसरा 264 धावांवर घोषित केला. भारत-पाकिस्तानमधील हा सामना ड्रॉ राहिला.

या सामन्यानंतर देवने मागे वळून पहिले नाही, आणि त्यांच्या टेस्ट कारकिर्दीत त्यांनी 131 कसोटी  सामने खेळले. आणि फक्त १ मॅच चुकले. यात त्यांनी 5248 धावा केल्या आणि 34 विकेट्ससह 64 कॅच पकडले. शिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये 5 हजार आणि 434 विकेट घेणारे ते पहिले क्रिकेटपटू ठरले. देवचा हा रेकॉर्ड माजी वेस्ट इंडिज क्रिकेटपटू कर्टनी वॉल्श यांनी सर्वात जास्त टेस्ट विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड मोडला. 4000 पेक्षा अधिक धावा आणि 400 विकेट घेणारे देव हे अद्याप एकमेव कसोटी खेळाडू आहे. देवने भारतासाठी 434 टेस्ट विकेट घेण्याचा विक्रम केला होता, पण काही काळानंतर माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी 619 घेत एक नवीन विक्रम स्थापित केला.

कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला होता. देवने त्यांच्या करिअरमध्ये अनेक अविस्मरणीय सामने खेळले आहेत. 1983 च्या विश्वचषक लीग सामन्यात ट्यूनब्रिज वेल्स येथे झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 175 धावांची खेळी कपिलच्या कारकीर्दीतील ऐतिहासिक ठरला. विशेष म्हणजे, या मॅचमधील शतक देवच्या वनडे करिअरमधील पहिले आणि अंतिम शतक होते.