भारतीय संघाचा सलामीवीर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने आजच्या दिवशी 2012 मध्ये दोन दशकांहून अधिक जुन्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला निरोप दिला होता. तेंडुलकरने अखेरचा वनडे सामना पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) खेळला होता. विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्ध क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिनने पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या दरम्यान त्याने अनेक जागतिक विक्रमांना गवसणी घातली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनने सर्वाधिक 18,426 धावा केल्या असून यामध्ये सर्वाधिक 49 शतकं आणि 96 अर्धशतकांचा समावेश आहे. सचिनने आपला शेवटचा वनडे ढाका येथे खेळला होता. 2012 च्या एशिया कप सामन्यात 18 मार्च रोजी भारतीय संघाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी झाला. हा सामना उच्च स्कोअरिंग गेम होता ज्यात भारताने विजयाची नोंद केली. सचिन तेंडुलकरच्या वनडे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा हा शेवटचा सामना होता. यानंतर सचिन कधीही भारताच्या निळ्या जर्सीमध्ये दिसला नाही. (मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा; 'या' विश्वविक्रमाला गवसणी घालून जिंकले क्रिकेट चाहत्यांचे मन!)
सचिनच्या अंतिम वनडे सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून निर्धारित 50 ओव्हरमध्ये 6 गडी गमावून 329 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 34 ओव्हरमध्ये 224 धावांवर पहिली विकेट गमावली. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने 133 धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर कोहलीसह रोहित शर्माने तिसर्या विकेटसाठी 172 धावांची भागीदारी केली. सचिन 52 धावा करून बाद झाला. सचिनने 23 वर्षाच्या वनडे कारकिर्दीत आपल्या खेळाने चाहत्यांचे मनोरंजन केले. करिअरच्या 20 पेक्षा अधिक वर्षाच्या कालावधीत तेंडुलकरने असे अनेक विश्वविक्रम केले आहेत जे अजूनही अतूट आहेत. या जाणून घ्या:
#OnThisDay in 2012, Sachin Tendulkar played his last one-day international!
Which is your favourite Sachin ODI knock of all time? 😍 pic.twitter.com/hpOVaJBwaa
— ICC (@ICC) March 18, 2020
1. सचिनने वनडे कारकिर्दीत सर्वाधिक 463 सामने खेळले आहेत.
2. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर सर्वाधिक धावा करण्याच्या विश्वविक्रमाची नोंद आहे. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये 18,426 धावा केल्या आहेत.
3. सचिनने ठोकले होते एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले दुहेरी शतक. सचिनने ग्वालियरमध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 8 वर्षांपूर्वी करिअरसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले दुहेरी शतक ठोकले होते.
4. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकंही केली आहेत. सचिनने 49 वनडे शतकं केली आहेत.
5. सचिनला रेकॉर्ड 62 वेळा सामनावीरचा पुरस्कार मिळवला आहे जो की एक जागतिक विक्रम आहे.
6. मास्टर-ब्लास्टरने वनडे क्रिकेटमध्ये विक्रमी 2,016 चौकार मारले आहे.
7. शतकासह सचिनने सर्वाधिक 96 वनडे अर्धशतकंही केली आहेत.
8. सचिनने सर्वाधिक 15 वेळा मालिकावीरचा पुरस्कार मिळवला आहे.
9. सचिनने वनडे विश्वचषकमध्ये देखील आपला प्रभाव पाडला आहे. त्याने 2002-03 वर्ल्ड कपमध्ये एकूण 673 धावा केल्या आहेत. क्रिकेटपटूने एका वर्ल्ड कपमध्ये केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.
10. सचिनने 1998 च्या संपूर्ण वर्षात वनडे क्रिकेटमध्ये 1,894 धावा केल्या. या क्रिकेटपटूने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक धावा असून आजही हा विक्रम अतूट आहे. सौरव गांगुली आणि राहुल द्रविड सारखे खेळाडू या विक्रमाच्या जवळ पोहचले मात्र हा रेकॉर्ड मोडू शकले नाही.
वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यावर सचिनने एक वर्षानंतर 2013 मध्ये अखेरचा टेस्ट सामनाही खेळला आणि अखेरीस आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला ब्रेक लावला.