सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय डेब्यू (Photo Credit: Twitter/BCCI)

Sachin Tendulkar International Debut vs Pakistan: 15 नोव्हेंबर, दिवस सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) चाहत्यांसाठी नेहमीच लक्षात राहण्यासाठी आहे. भारताचे महान फलंदाज सचिनने आजच्याच दिवशी 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) कराची (Karachi) येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 24 वर्षांनंतर, आजच्या दिवशी सचिनने वेस्ट इंडीजविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंतिम वेळी फलंदाजीसाठी बाहेर पडला.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)) ट्विटरवर सचिनच्या पहिल्या आणि शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्याचा फोटो कोलाज शेअर केला व करोडोंना प्रेरित करण्यासाठी मास्टर-ब्लास्टरचे आभार मानले. "या दिवशी 1989 मध्ये सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले- द लीजेंड एकदा अंतिम वेळी टीम इंडियासाठी फलंदाजी करण्यासाठी बाहेर पडला, जगभरातील कोट्यवधी लोकांना प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद." (Sachin Tendulkar याला भेटल्यावर Yuvraj Singh याला करायची नव्हती अंघोळ, सांगितला पहिल्या भेटीच्या आठवणीतील किस्सा, पाहा Video)

क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन एकमेव क्रिकेटपटू असून ज्याने 100 आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली आहेत, पण सचिनच्या पदार्पणची सुरुवात काही खास  नाही. पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सचिनने 15 धावा केल्या आणि वकार युनूसने त्याला माघारी धाडलं. शिवाय, भारतासाठी अखेरच्या सामन्यात सचिनने 74 धावा केल्या. सचिन तेंडुलकरने 24 वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केले आणि या दरम्यान त्याने सहा विश्वचषक खेळले मात्र त्याला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 2011 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. सचिनने 51 कसोटी शतक आणि 49 वनडे शतकं केली आहेत. सचिनने 200 कसोटी सामन्यात 15921 धावा आणि 463 वनडे सामन्यात 18426 धावा फाटकावल्या आहेत.

सचिन कसोटी क्रिकेटमधील सर्वात युवा पदार्पण करणारा (आणि अजूनही आहे) बनला आहे आणि आजवरच्या कारकिर्दीत महान फलंदाजाने 34,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सचिनने 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल टाकले. भारतीय क्रिकेटमध्ये 24 वर्षांच्या गौरवशाली कारकीर्दीस सचिनने 16 नोव्हेंबर, 2013 रोजी दोनशे कसोटी सामना खेळून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गेल्या वर्षी आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारा सचिन सहावा भारतीय ठरला. मास्टर ब्लास्टरने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचे मेंटर म्हणूनही काम केले आहे.