'संघात निवड करण्यासाठी वडिलांकडे मागितली होती लाच,' विराट कोहलीने शेअर केली बालपणीची आठवण
विराट कोहली (Photo Credit: @BCCI/Twitter)

टीम इंडियाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नुकतंच लाईव्ह इंस्टाग्राम सत्रा दरम्यान लहानपणीची एक आठवण सांगितली ज्यात त्याच्या वडिलांनी कशा पद्धतीने दिल्ली जुनिअर क्रिकेट टीममध्ये निवड करण्यासाठी लाच मागितल्यावर नकार दिला होता हे सांगितलं. जगातील अव्वल क्रमांकाच्या वनडे फलंदाजाला लाच मागितली आहे हे कळू शकले नाही. परंतु संघाने त्याला नाकारले असे सांगितले. कोहली आज क्रिकेट विश्वातील एक यशस्वी फलंदाज आहे, परंतु कोहलीने येथे पोहोचण्यासाठी खूप परिश्रम केले आहेत आणि आजही या ठिकाणी राहण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. कोहली आपल्या मैदानावरील भावना स्पष्टपणे खुलेपणाने व्यक्त केला असला तरी तो आपल्या कुटूंबाबद्दल फारसा बोलत नाही. पण अलीकडेच त्याने आपल्या जीवनातील एक महत्त्वाची घटना भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्रीबरोबर शेअर केली जेव्हा त्याच्या वडिलांनी लाज न दिल्याने त्याची संघात निवड झाली नाही. (अनुष्का शर्मा ने उघड केला विराट कोहली याचा खोटारडेपणा, सुनील छेत्री याला लाईव्ह चॅटमध्ये झाले हसू अनावर, पाहा Video)

31 वर्षीय कोहली म्हणाला की तो नियमित खेळाडूंच्या निवडीच्या निकषात फिट बसत नसतो. त्यामुळे निवडकर्त्यांनी वडिलांशी संपर्क करून संघात निवड करण्यासाठी लाजेची मागणी केली जी त्याच्या वडिलांनी स्पष्ट नाकारली. “दिल्लीत कधीकधी अशा अनेक गोष्टी होतात ज्या अयोग्य असतात. अशाच पद्धतीने एकदा निवड करताना एका व्यक्तीने नियमांचं अजिबात पालन केलं नाही. निवड होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी असतानाही त्याने माझ्या वडिलांकडे अजून थोडं (लाच) हवं असं सांगितलं. मध्यमवर्गीय कुटुंबात असणारे माझे वडील खूप मेहनत करुन एक यशस्वी वकील झाले होते. त्यावेळी त्यांना अजून थोडं म्हणजे नेमकं काय सांगतायत हे कळलं नाही. माझ्या वडिलांनी त्याला स्पष्ट सांगितलं की, मेरिटवर निवड होणार असेल तर विराटची निवड करा. मी त्याव्यतिरिक्त काहीही देणार नाही,” या घटनेनंतर विराटची निवड झाली नाही. तो खचून गेला आणि रडला. पण या घटनेने त्याला भरपूर काही शिकवले.

विराट म्हणाला, त्या घटनेने मला खूप काही शिकवलं. त्यावेळी मला कळालं की यशस्वी होण्यासाठी मला असामान्य कामगिरी करण्याची गरज आहे आणि त्यासाठी मला मेहनत करावी लागणार आहे. माझ्या वडिलांनी शब्दांनी नाही तर त्यांच्या कृतीने मला योग्य मार्ग दाखवला.” विराट क्रिकेट सामना खेळत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. स्वतःला सांभाळून विराट दुसऱ्या दिवशी मॅच खेळायला गेला आणि संघाला विजय मिळवून दिला.