क्रिकेट वर्ल्डकप 2019 साठी संघात कुणाचेही स्थान पक्के नाही : रोहित शर्मा; अंबाती रायुडूच्या शतकी खेळीचेही कौतुक!
Rohit Sharma | (Photo Credits- Twitter @BCCI)

भारताने वेस्टइंडीज संघाचा २४४ धावांनी धुव्वा उडवून मालिकेतला चौथा एकदिवसीय सामना जिंकला. या सामन्यात रोहित शर्मा आणि अंबाती रायुडू या दोन्ही खेळाडूंनी शतक ठोकले. रोहितने १६२ धावांची तुफानी खेळी केली तर रायुडूने १०० धावा केल्या. रोहित शर्मा या मालिकेत दमदार फोर्मात असून आगामी विश्वचषक २०१९ साठी संघात त्याचं स्थान पक्क समजलं जात आहे. परंतु त्याने मात्र संघात कोणाचेही स्थान पक्क नाही असं म्हटलं आहे. नक्की वाचा: भारताने तब्बल 224 धावांनी वेस्टइंडीजचा केला पराभव; मालिकेत 2-1ने घेतली आघाडी.

सामना संपल्यानंतर रोहित म्हणाला, “ ‘वर्ल्डकपसाठी आणखी काहीही निश्चित सांगू शकत नाही. वर्ल्डकपसाठी आणखी बराच कालावधी आहे. वर्ल्डकपसाठीच्या संघात अजून कोणाचेही स्थान पक्के नाही". तसेच त्याने आपलं सहकारी आणि शतकवीर अंबाती रायुडूच्या खेळीचीही तारीफ केली. रायुडूच्या कामगिरीबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “रायडूने आजच्या सामन्यात आपली नैसर्गिक फलंदाजी केली. रायडूने कर्णधाराचा विश्वास सार्थ केल्याचे पाहून मी आनंदी आहे". या सोबत आगामी ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यात रायुडू किती महत्वाचा ठरेल हे सुद्धा सांगितलं.

भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय सामना हा तिरूवनंतपूरमला १ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. त्यानंतर दोन्ही संघात तीन सामन्यांची T20 मालिका सुद्धा खेळवली जाणार आहे.