PC-X

Michael Bracewell New Zealand New Captain: न्यूझीलंडला चॅम्पियन्स ट्रॉफीचे (Champions Trophy) विजेतेपद जिंकता आले नाही. भारताने अंतिम सामन्यात किवी संघाचा पराभव करून त्यांचे स्वप्न भंग केले. आता दोन्ही संघ आपापल्या देशात परतले आहेत. न्यूझीलंड संघाला त्यांची पुढची मालिका पाकिस्तानसोबत खेळायची आहे. ज्यासाठी किवी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाचा कर्णधारही बदलला आहे. मिचेल सँटनरच्या जागी मायकेल ब्रेसवेल (Michael Bracewell) ला कमांड देण्यात आली आहे.

मायकेल ब्रेसवेलकडे कर्णधारपद

न्यूझीलंड संघ आता पाकिस्तानसोबत 5 सामन्यांची घरच्या मैदानावर टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 16 मार्चपासून सुरू होईल. या टी-20 मालिकेसाठी मायकेल ब्रेसवेलला न्यूझीलंड संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये किवी संघाचे नेतृत्व करणाऱ्या मिचेल सँटनरला या मालिकेतून वगळण्यात आले आहे. याशिवाय, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या आणि प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब जिंकणाऱ्या रचिन रवींद्रलाही या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ

मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), फिन ऍलन, मार्क चॅपमन, जेकब डफी, जॅक फौल्क्स, मिच हे, मॅट हेन्री, काइल जेमिसन, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, विल ओ'रोर्क, टिम रॉबिन्सन, बेन सीयर्स, टिम सेफर्ट, ईश सोधी.