सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी (Photo Credit: Getty Images and Twitter)

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने काही दिवसांपूर्वी बालपणीचा मित्र आणि भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) याला त्याने गायलेले एक गाणे 'क्रिकेट वाली बीट पे' (Cricket Wali Beat Pe) चे नवीन रॅप गाणे गायचे चॅलेंज दिले होते. आणि आता कांबळीने यात अव्वल पद्धतीचा रॅप केला आणि सचिनने कौतुकाचा वर्षावच केला. कांबळीच्या रॅप कौशल्यामुळे सचिन खूप प्रभावित झाला आणि शहरात एक नवीन रॅपर आहे आल्याचे म्हटले. यापूर्वी जानेवारीत सचिनने कांबळीला त्यांच्या 'क्रिकेट वाली बीट' या गाण्यावर रॅप करण्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान कांबळीने आनंदाने स्वीकारले. कांबीने दिलेल्या वेळेपेक्षा थोडासा वेळ घेतला असला तरी 03 फेब्रुवारी रोजी एका स्टुडिओमध्ये त्या भागातील गाण्याचा एक भाग त्याने शेअर केला. सचिनने बुधवारी कांबळीचा व्हिडीओ रिट्वीट करून सांगितले की, कामगिरीमुळे तो प्रभावित झाला आहेत. (Video: सचिन तेंडुलकर ने विनोद कांबळी ला दिले चॅलेंज, म्हणाला एका आठवड्यात 'हे' करून दाखव)

"प्रिय मास्टर ब्लास्टर, एक बार जो मैंने कमिटमेंट करदी उसके बाद में खुदकी भी नहीं सुनता!" 'वांटेड' या बॉलिवूड चित्रपटामधील हा संवाद लिहीत कांबळीने व्हिडिओसह ट्विट पोस्ट केलं. व्हिडीओला पुन्हा ट्विट करीत सचिनने लिहिले: "हे खरंच प्रभावी आहे, विनोद. शहरात नवीन रॅपर आल्याचे दिसत आहे." कांबळीने शेअर केलेला रॅप इतका भन्नाट आहे की तुम्हीही त्याचे कौतुक केल्याशिवाय राहू शकणार नाही.

सचिनने सोनू निगम यांच्यासमवेत एप्रिल 2017 मध्ये क्रिकेट वाली बीट हे गाणे प्रसिद्ध केले होते. विश्वचषक खेळणाऱ्या आपल्या साथीदारांसाठी त्याने हे गाणे त्याने समर्पित केले. सचिनने कांबळीला आव्हान दिलं आणि म्हणाला, "माझं हे गाणं रॅप कर असं मी तुम्हाला आव्हान देतो. तुझ्याकडे 28 जानेवारीपर्यंतची वेळ आहे." गाण्याच्या रॅप पार्टमध्ये वेगवेगळ्या ड्राईव्ह आणि शॉट्सचा समावेश आहे. यात दिग्गज विराट कोहली आणि एमएस धोनीसह महान भारतीय क्रिकेटपटुंच्या नावाचाही समावेश केला आहे.