Navdeep Saini Injury Update: क्रिकेटर नवदीप सैनीच्या दुखापतीवर बीसीसीआयने दिला अपडेट, गब्बा टेस्टमध्ये मधेच सोडावं लागलं मैदान
नवदीप सैनी (Photo Credits: Twitter/BCCI)

Navdeep Saini Injury Update: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) दरम्यान ब्रिस्बेन कसोटीच्या (Brisbane Test) पहिल्याच दिवशी टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो. टीम इंडियाच्या (Team India) दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत आता सैनीचे नाव जुडले आहे. मांडीवरील अडचणीमुळे वेगवान गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep Saini) मैदानाबाहेर आहे. मेडिकल टीम सैनीच्या दुखापतीकडे लक्ष देत आहे. सैनीची दुखापत किती गंभीर आहे याची माहिती समोर आलेली नाही. आपला दुसरा कसोटी सामना खेळणारा सैनी डावातील 36वी आणि त्याच्या आठव्या षटकातील पाचव्या चेंडूनंतर जखमी झाला होता ज्यामुळे त्याला सामन्याच्या मधेच मैदान सोडून जावे लागले. सैनीबाबत बीसीसीआयने नुकताच एक अपडेट जारी केला आहे ज्यानुसार सैनीला ग्रोईंनचा त्रास झाला होता. सैनी मैदानाबाहेर गेल्यावर रोहित शर्माने त्याची ओव्हर पूर्ण केली. डावाच्या 36व्या षटकातील शेवटचा चेंडू रोहितने फेकला. (IND vs AUS 4th Test 2021: दुखापतीने टीम इंडिया त्रस्त, वेगवान गोलंदाजाने ब्रिस्बेन टेस्टच्या दुसऱ्या डावात सोडले मैदान)

सिडनी टेस्टनंतर टीम इंडियाला रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि हनुमा विहारी यांच्या दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. सैनीच्या दुखापतीने संघाच्या चिंतेत अजून भर पडू शकते आणि यामुळे अजिंक्य रहाणेच्या गोलंदाजीतील संसाधनांवर अधिक ताण येईल. बुमराह, जडेजा, अश्विन आणि विहारी दुखापतीमुळे ब्रिस्बेन सामना खेळत नाही आहे तर टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदरला त्यांच्या जागी पदार्पण करीत आहेत, तर शार्दुल ठाकूर आणि मयंक अग्रवाल यांचंही प्लेइंगे इलेव्हनमध्ये कमबॅक झालं आहे. 

चार सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहेत. अ‍ॅडिलेडमधील डे-नाईट टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्सने विजय मिळविला होता, प्रत्युत्तरात भारताने मेलबर्न टेस्टमध्ये जबरदस्त पुनरागमन करत 8 ने विजय मिळवून 1-1 अशी बरोबरी केली. सिडनी कसोटीनंतर एक संघ पुढाकार घेईल असे वाटत होते, पण पाच दिवस चाललेल्या या सामन्यात यजमान संघ विजयाच्या उंबरटयावर असताना भारतीय खेळाडूंनी दुखापतीनंतरही शानदार खेळ करत सामना ड्रॉ केला होता.