National Sports Day 2020 निमित्त सचिन तेंडुलकर याचे खास ट्विट; देशाला फीट आणि हेल्थी करण्यासाठी दिला 'हा' संदेश
सचिन तेंडुलकर (Photo Credits: Getty)

आज 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day). भारताचे दिग्गज हॉकीपटू ध्यानचंद (Major Dhyan Chand) यांच्या जयंती दिवशी देशात क्रीडा दिन साजरा केला जातो. आज क्रीड दिनानिमित्त क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने खास ट्विट केले आहे. यात त्याने खेळाचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने दिवसातून काही वेळ खेळ खेळले पाहिजे असे आग्रहाने सांगितले आहे. त्यामुळे देश फीट आणि हेल्थी होईल, असेही तो म्हणाला.

खेळ फक्त मजेसाठी नसून त्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फीट होता. त्यामुळे स्वतःला आणि तुमच्या प्रियजनांना दररोज काहीवेळ खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यामुळे आपण भारताला अधिक हेल्थी आणि फीट करण्यास मदत करु, असे सचिन तेंडुलकर याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटसोबत त्याने स्वतःचा विविध खेळ खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. (सचिन तेंडुलकरने केली भगवान गणेशाची स्थापना, पत्नी अंजली आणि मुलगी सारा सोबत केली आरती, See Pics & Video)

Sachin Tendulkar Tweet:

29 ऑगस्ट 1950 मध्ये उत्तर प्रदेश मधील इलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला. हॉकीमधील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना हॉकीचे जादूगार बोलले जात होते. मेजर ध्यानचंद यांना खेळ जगतात दद्दा नावाने ओळखले जात होते. यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसंच देशवासियांना क्रिडीदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.