Happy Ganesh Chaturthi 2020: 22 ऑगस्ट रोजी म्हणजे आपासून सुरु झालेल्या महोत्सवाच्या विशेष निमित्ताने सचिन तेंडुलकरने (SachinTendulkar) चाहत्यांना गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) 2020 च्या शुभेच्छा दिल्या. शुभ प्रसंगी सचिनने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. एकीकडे त्याचे चाहते सचिनची उपासना करत असतात पण मास्टर-ब्लास्टर आपल्या कुटुंबासमवेत गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करत असताना श्री गणेशाची पूजा करताना दिसला. गणेशोत्सव महाराष्टात मोठ्या उत्साहाने साजरा होणार सण आहे, पण यंदा कोरोनाच्या प्रसारामुळे सार्वजनिक समारंभ वगळता भक्तगण साधेपणाने हा उत्साह साजरा करत आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी चाहत्यांच्या उत्साहात कोणतीही कमतरता जाणवली नाही. जगभर गणेशोत्सव साजरा होत असताना ‘क्रिकेटचा देव’ सचिननेही हा उत्सव आपल्या परिवारासह साजरा केला. सचिनने पत्नी, अंजली आणि मुलगी साराबरोबरचा एक व्हिडिओ आणि दोन फोटो शेअर केले. (Happy Ganesh Chaturthi 2020: CSK, KKR म्हणाले-'गणपती बाप्पा मोरया'; फ्रँचायझी, खेळाडूंनी खास अंदाजात दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा See Tweets)
व्हिडिओमध्ये सचिन आपल्या पत्नी, कर्मचारी आणि इतर कुटुंबातील सदस्यांसह गणेश आरती करताना दिसतो. उर्वरित कुटुंबातील सदस्यांना व्हिडिओ कॉलद्वारे कनेक्ट केलेले पाहिले जाऊ शकते. व्हिडिओशिवाय सचिनने दोन फोटो शेअर केले आहेत, एक ती त्याची पत्नी आणि दुसर्या फोटोमध्ये त्याची मुलगी सारा पिवळा सूट परिधान केलेली दिसली. "गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.' असे कॅप्शन सचिनने व्हिडिओला दिले.
सचिनचा व्हिडिओ:
सचिनची मुलगी, सारा एक सोशल मीडिया स्टार आहे. ती प्रसिद्धीपासून दूर असतानाही तिच्या आश्चर्यकारक फॅशन फोटोमुळे ती बर्याचदा चर्चेचा विषय बनते. वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना आणि गौतम गंभीर यांच्यासह अनेक क्रिकेटपटुंनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. सेहवागने गणपती बाप्पाची पूजा करताना फोटो शेअर केले तर गंभीरने शिखर धवन आणि हरभजन सिंहबरोबर देवाचे चित्र शेअर केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.