PC-X

Mumbai Indians vs Delhi Capitals TATA IPL 2025 Live Streaming: टाटा आयपीएल 2025 (IPL) चा 63 वा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. मुंबई इंडियन्ससाठी हा सामना खूप महत्त्वाचा असेल. मुंबई इंडियन्सचा (MI vs DC) संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे आणि आज त्यांना कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकायचा आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी 7 जिंकले आहेत, तर 6 सामन्यांमध्ये पराभव पत्करवा लागला आहे. मुंबई 14 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, दिल्लीसाठीही हा सामना करा किंवा मरो असा आहे. दिल्ली संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना जिंकणे देखील आवश्यक आहे.

दिल्ली संघानेही 12 सामने खेळले आहेत. ज्यात त्यांनी 6 सामने जिंकले. तर 5 मध्ये पराभव पत्कारावा लागला आहे. दिल्ली पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांकडे अनेक स्फोटक फलंदाज आहेत. जे सामन्याचा मार्ग बदलू शकते.

आयपीएल 2025 चा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील 63 वा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?

आयपीएल 2025 चा ६३ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज म्हणजेच २१ मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. तर टॉस त्याच्या अर्धा तास आधी होईल.

आयपीएल 2025 चा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील 63 वा सामना तुम्ही कोणत्या टीव्ही चॅनेलवर पाहू शकता?

आयपीएल 2025 चा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील 63 वा सामना स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल.

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल 2025 च्या 63 व्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे उपलब्ध असेल?

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल 2025 चा 63 वा सामना JioHotstar अॅपवर ऑनलाइन पाहता येईल.

मुंबई इंडियन्स संघ : रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा, राज बावा, रॉबिन मिंज, अश्विन कुमार, रॉबिन मिंज, रॉबिन मिंज, रॉबिन, मिचेल टॉप उर रहमान, कृष्णन सृजित, रघु शर्मा, अर्जुन तेंडुलकर, बेव्हॉन जेकब्स, सत्यनारायण राजू

दिल्ली कॅपिटल्स संघ : अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल (कर्णधार), केएल राहुल, फाफ डू प्लेसिस, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, विपराज निगम, कुलदीप यादव, टी नटराजन, मुस्तफिजुर रहमान, दुष्मंथिक चमेरा, मदहनुल्लाह, वीरपुरुल्ला, त्रिपुरुल्ला, नटराजन. तिवारी, मोहित शर्मा, मुकेश कुमार, अजय जाधव मंडल, दर्शन नळकांडे, डोनोवन फरेरा. मनवंत कुमार एल