Mumbai Indians Playing XI vs CSK: रोहित शर्मासमोर प्लेइंग इलेव्हनचा पेच, पहिल्या सामन्यात असे असू शकते मुंबई इंडियन्सचे संभाव्य 11
एमएस धोनी आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

गतविजेत्या मुंबई इंडियन्सकडे (Mumbai Indians) गेल्या दोन वर्षांपासून एक सेट प्लेइंग इलेव्हन आहे पण हार्दिक पांड्याने गोलंदाजी टाळल्याने त्याने कर्णधार रोहित शर्मासमोर (Rohit Sharma) डोकेदुखी निर्माण केली आहे की त्याने कोणाची निवड करावी - राहुल चाहर व्यतिरिक्त अतिरिक्त सीमर किंवा अतिरिक्त फिरकीपटू. इंडियन प्रीमियर लीग 2021 (Indian Premier Legue) चा दुसरा टप्पा आता फक्त काही तासांवर आला आहे. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स  (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्या 19 सप्टेंबरला होणार आहे. मुंबई इंडियन्स संघ पाच वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन असला तरी यंदा भारतात खेळलेल्या पहिल्या टप्प्यात संघाला फारशी चांगली कामगिरी करता अली नाही. चॅम्पियन संघ ज्या पद्धतीने खेळतो त्याप्रमाणे संघ खेळताना दिसला नाही. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स हा असा एक संघ आहे, जो त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल करत नाही. संघाचे केवळ 15-16 खेळाडू आयपीएलच्या संपूर्ण हंगामात खेळतात. चेन्नईविरुद्ध संघाची प्लेइंग इलेव्हन काय असेल हे जवळपास निश्चित झाले आहे. (IPL 2021 in UAE: फाफ डु प्लेसिसच्या अनुपस्थितीत CSK साठी कोण असणार दुसरा ओपनर, ‘या’ तीन खेळाडूंची नावे आघाडीवर)

चेन्नईविरुद्ध पहिल्या सामन्यातही संघाचा कर्णधार रोहित शर्मा सलामीवीर म्हणून मैदानात उतरेल, याबद्दल फारशी शंका नाही. क्विंटन डी कॉक त्याचा सलामी साथीदार असेल. यानंतर, जर आपण तिसऱ्या क्रमांकाबद्दल बोललो तर सूर्यकुमार यादवसाठी हे स्थान जवळजवळ निश्चित झाले आहे, तर ईशान किशन पुन्हा एकदा चौथ्या क्रमांकावर दिसेल. संघाच्या सर्वोच्च क्रमवारीत क्वचितच कोणताही बदल होत आहे. यानंतर, संघाकडे जगातील दोन सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहेत, किरोन पोलार्ड पाचव्या क्रमांकावर असेल, तर हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर येईल. यानंतर कृणाल पांड्या फलंदाजीसह बॉलिंगने देखील संघात योगदान देऊ शकतो. संघाकडे कृणाल आणि राहुल चाहर हे दोन फिरकीपटू आहेत. तसेच बऱ्याच वेगवान बॉलिंग पर्यायांसह, मुंबई इंडियन्स जयंत यादव सारख्या एखाद्याला प्राधान्य शकते ज्यांच्याकडे उत्कृष्ट फलंदाजीची क्षमता आहे. याशिवाय फिरकीला अनुकूल विकेटवर जयंत यादव त्यांना उपयुक्त ठरू शकतो. यादवने पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी केल्याने तो एक उत्कृष्ट फलंदाजी पर्याय देखील ठरू शकतो.

दुसरीकडे, वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट हे नियमित बॉलर्स असतील. मात्र खेळपट्टीकडे पाहता जर जयंत यादवचा समावेश न करता मुंबई नॅथन कुल्टर-नाईलला संधी देऊ शकते.

मुंबई इंडियन्स संभावित प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जयंत यादव/नॅथन कुल्टर-नाईल, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.