इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मध्ये 27 मार्च रोजी मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (CCI) ब्रेबॉर्न स्टेडियमवर पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन (Mumbai Indians) ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल. 2021 च्या हंगामातील निराशा भरून काढून रोहित आणि कंपनी 2022 मध्ये विक्रमी सहावे जेतेपद जिंकण्याच्या निर्धारित असेल. दिल्ली, कोलकाता नाईट रायडर्स (KKR), राजस्थान रॉयल्स (RR), आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) सोबत मुंबई इंडियन्स स्पर्धेच्या अ गटात आहेत. एकाच गटातील संघ दोनदा एकमेकांशी भिडतील. तर मुंबई इंडियन्स गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध एक दुहेरी हेडर सामना देखील देखील खेळेल. (IPL 2022 Schedule Released: आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जारी, चेन्नई सुपर किंग्ज आणि KKR यांच्यातील सामन्याने वाजणार बिगुल; पहा संपूर्ण शेड्युल)
तर हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स (GT), सनरायझर्स हैदराबाद (SRH), पंजाब किंग्स (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) यांच्याविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील. मुंबई इंडियन्स संघासाठी 2022 चा हंगाम खास असेल कारण 70 पैकी 55 सामने त्यांच्या मुंबई शहरात होणार आहेत. वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि DY पाटील स्टेडियम हे शहरातील यजमान ठिकाण असतील तर उर्वरित 15 लीग सामने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियममध्ये होतील. मुंबई त्यांचे होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर चार सामने खेळणार आहेत. मुंबई इंडियन्सचे पूर्ण शेड्युल खालीलप्रमाणे आहे.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, ब्रेबॉर्न-सीसीआय, मुंबई
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 2 एप्रिल, DY पाटील स्टेडियम, मुंबई
कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 6 एप्रिल, एमसीए स्टेडियम, पुणे
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, 9 एप्रिल, एमसीए स्टेडियम, पुणे
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 12 एप्रिल, एमसीए स्टेडियम, पुणे
मुंबई इंडियन्स वि लखनौ सुपर जायंट्स, 16 एप्रिल, ब्रेबॉर्न-CCI, मुंबई
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 21 एप्रिल, DY पाटील, मुंबई
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 एप्रिल, वानखेडे स्टेडियम, मुंबई
राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 30 एप्रिल, DY पाटील स्टेडियम
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 6 मे, ब्रेबॉर्न- CCI
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 9 मे, डीवाय पाटील स्टेडियम
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 12 मे, वानखेडे स्टेडियम
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 17 मे, वानखेडे स्टेडियम,
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 22 मे, वानखेडे स्टेडियम
मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरॉन पोलार्ड यांना कायम ठेवले आहे. तर ईशान किशनला आयपीएल लिलावात 15.25 koti रुपयांत खरेदी केली. तसेच मुंबईस्थित फ्रँचायझी संघाने इंग्लिश वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला 8 कोटी रुपयात संघात सामील केले पण तो 2022 च्या आवृत्तीसाठी उपलब्ध होणार नाही.