 
                                                                 Mumbai vs Lucknow: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 45 वा सामना रविवार म्हणजे 27 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (MI vs LSG) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 54 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, लखनौने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाने 20 षटकात सात गडी गमावून लखनौ सुपर जायंट्स 216 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौ सुपर जायंट्सचा संघ 20 षटकात सर्वबाग होवून 161 धावा करु शकला.
रिकेल्टन आणि सूर्याची स्फोटक खेळी
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या संघाने निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 215 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून स्फोटक सलामीवीर रायन रिकेलटनने 58 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, त्याने 32 चेंडूत सहा चौकार आणि चार षटकार मारले. रायन रिकेलटनशिवाय प्राणघातक फलंदाज सूर्यकुमार यादवने 54 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सकडून मंयक यादव आणि आवेश खान प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
बुमराह आणि बोल्टची घातक गोलंदाजी
त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सचा संघ 161 धावांवर सर्वबाद झाला ज्यामध्ये आयुष बदोनीने सर्वाधिक 35 धावा केल्या तर मिशेल मार्शने 34 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने 4 तर ट्रेंट बोल्टने 3 विकेट घेतल्या.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
