महेंद्र सिंघ धोनी (Photo Credits: Getty Images)

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंघ धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या निवृत्तीच्या चर्चा सध्या जोर पकडत आहे. आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमधील आपल्या निराशाजनक खेळी नंतर चाहते आणि क्रीडा तज्ञ धोनीवर नाखूष दिसत आहे. धोनीला जगातील फिनिशरांपैकी एक मानले जाते पण यंदाच्या विश्वचषकमध्ये या लौकिकाला साजेशी कामगिरी धोनीला करता आली नव्हती. त्यामुळे धोनी लवकरच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आणि त्यानंतर धोनी अन्य काही क्रिकेटपटूंनप्रमाणे राजकारणात प्रवेश प्रवेश करणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

भारतात असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला आहे. कीर्ती आझाद (Kirti Azad), नवजोत सिंघ सिद्धू (Navjot Singh Sidhu), मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यासारखे क्रिकेटमधील दिग्गजांनी आपली दुसरी इंनिंग्स सुरु केली. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप  (BJP) नेते संजय पासवान (Sanjay Paswan) यांनी यासंदर्भात आयएएनएस (IANS) वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, "महेंद्रसिंह धोनी भाजपमध्ये प्रवेश करू शकतो. बऱ्याच काळापासून याविषयी पक्षात चर्चा सुरु आहे. मात्र, महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय होईल."

दुसरीकडे, धोनीचे जन्मस्थान झारखंड (Jharkhand) मध्ये यंदाच्या वर्षा अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या निवडणुकीत भाजपकडून ऐनवेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून धोनीचे नाव पुढे केले जाऊ शकते. त्यामुळे आता माही राजकारणात प्रवेश करणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.