भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देण्याची घोषणा केली. दोन वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराच्या या निर्णयानंतर त्याचे चाहते आणि माजी दिग्गजांकडून त्याच्यासाठी फेअरवेल सामन्याची मागणी केली जात आहे. आणि आता ती मागणी पूर्ण होईल असे दिसत आहे. आता बीसीसीआयच्या (BCCI) एका अधिकाऱ्याने सांगितले की, धोनीच्या निरोप सामन्याचा विचार केला जात आहे. IANSशी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्यें सांगितले की, बोर्ड इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) आगामी आवृत्ती दरम्यान धोनीशी बोलणा करेल आणि त्यानुसार योजना आखेल. "आत्ता कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका नाही. कदाचित आयपीएलनंतर काय करता येईल का ते आपण पाहू शकू कारण धोनीने देशासाठी बरेच काम केले आहे आणि तो सर्व आदराचा पात्र आहे. आम्हाला नेहमीच त्याच्यासाठी फेअरवेल सामना (Dhoni Farewell Match) आयोजित करण्याची इच्छा होती पण धोनी हा वेगळा खेळाडू आहे. कोणीही विचार करत नसताना त्याने निवृत्तीची घोषणा केली," अधिकाऱ्याने म्हटले. (MS Dhoni Farewell Match: एमएस धोनीसाठी ‘नो फेअरवेल गेम’, माजी IPL अध्यक्ष राजीव शुक्ला यांचे मोठे विधान)
धोनीबरोबर अजून काही बोलणी झाली आहे का असे विचारले असता अधिकारी म्हणाले, "नाही, पण आम्ही आयपीएल दरम्यान त्याच्याशी बोलू आणि एखाद्या सामन्याबद्दल किंवा मालिकेबद्दल त्याचे मत जाणून घेण्यासाठी तेच योग्य जागा असेल. त्याच्यासाठी योग्य तो सत्कार समारंभ असेल तो त्यावर सहमत असेल किंवा नसेल तरीही. त्याचा सत्कार करण्याचा आमचा सन्मान असेल." आयपीएल यंदा युएई येथे होणार आहे सर्व चाहते टीव्ही-स्क्रीनवर धोनीला पाहण्यासाठी आयुर असतील.
यापूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही माजी भारतीय कर्णधारपदासाठी फेअरवेल सामन्याची मागणी केली होती. झारखंड यजमान असेल असे सांगून सोरेन यांनी बीसीसीआयकडे अपील केले होते. धोनी 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वनडे वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयी टीम इंडियाचे नेतृत्व केले. 2019 वर्ल्ड कपमधील न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर माजी कर्णधार एकही स्पर्धात्मक क्रिकेट खेळला नाही आणि 15 ऑगस्ट रोजी निवृत्ती जाहीर करत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय भवितव्या विषयीच्या सर्व अनुमानांना शांत केले.