एमएस धोनी, माइक हसी (Photo Credit: Getty)

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माइकल हसी (Mike Hussey) यांनी गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) “हिशोब करणाऱ्या मनाचे” कौतुक केले. 'मिस्टर क्रिकेट' च्या नावाने प्रसिद्ध हसी यांनी धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी फिट असल्याचे म्हटले. परंतु निवृत्तीच्या संभाव्यतेकडे लक्ष देताना हसी पुढे म्हणाले की फक्त धोनीला त्याच्या योजना माहित आहेत. यावेळी आयपीएल (IPL) 2020 असते तर हसी चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजी कोचच्या भूमिकेत दिसला असता. कोविड-19 च्या प्रसारामुळे आयपीएल टूर्नामेंट पूढील सूचना येई पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. बुधवारी चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) इन्स्टाग्राम पेजवर हसी म्हणाले, “अर्थातच तो अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. पण त्याच्या मनात काय आहे ते उत्तर देण्यासाठी धोनी सर्वोत्तम व्यक्ती आहे.” सीएसकेचे फलंदाजी प्रशिक्षक पुढे म्हणाले की, तो धोनीसारख्या कोणालाही भेटला नाही. (IPL मध्ये एमएस धोनी म्हातारा म्हणून काढायचा छेड, 2018 फायनलनंतर धोनीने दिलेल्या शर्यतीच्या आव्हानाचा ड्वेन ब्रावोने केला खुलासा)

“एमएस नेहमीच खूप कॅल्क्युलेटिव्ह राहिला आहे. मला लवकरात लवकर सामना संपवायचा आहे, लेकिन धोनी म्हणेल-नाही कारण जो गोलंदाजी करायला येणार आहे किंवा इतर कोणी येईल, त्याला पाहून समजायची गरज आहे.” हसी पुढे म्हणाला की, “धोनीसारख्या कोणालाही त्या संदर्भात भेटलो असे मला वाटत नाही. होय, त्याला एक गणना करणारा मेंदू मिळाला आहे परंतु त्याला ती अविश्वसनीय शक्ती देखील मिळाली आहे. जेव्हा त्याला षटकार ठोकायचा आहे तेव्हा त्याला माहित आहे आणि तो ते करू शकतो. हे असे माझ्याकडेही नाही.”

धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने यापूर्वीही तीन आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत होऊन भारत विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर पडल्यापासून माजी भारतीय कर्णधार क्रिकेटपासून दूर आहे. यावर्षीच्या टी-20 विश्वचषक संघात निवड होण्यासाठी तो आयपीएलमधून क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता. पण कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे टी-20 टूर्नामेंट अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली.