माइकल वॉन (Photo Credit: Getty Images)

कोरोना व्हायरस महामारीमुळे सध्या क्रिकेट स्पर्धांवर ब्रेक लागल्याने अनेक खेळाडू सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधत आहे. जागतिक महामारीमुळे जवळपास सर्वच क्रिकेटपटू आपापल्या घरात वेळ घालवत होते. अशात अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या सार्वकालिन एकादश संघांची निवड केली आहे. त्याप्रमाणेच इंग्लंडचा माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) यानेही एक आगळी-वेगळी ऑल टाईम 11 टेस्ट टीमची निवड केली. या टीमचे वैशिष्ट्य म्हणजे या टीममधील सर्व खेळाडू 'टकलू' (Bald) आहेत. वॉनने आपल्या संघात सर्व टक्कल असणाऱ्या खेळाडूंना स्थान दिले आणि याची माहिती त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन दिली. सलामी जोडीसाठी त्यांनी इंग्लंडचे माजी क्रिकेटर ग्रॅहम गूच आणि दक्षिण आफ्रिकेचा हर्शल गिब्ज यांना निवडले. गूच एकावेळी काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक होते, तर गिब्ज हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जात होता. (शोएब अख्तरने भारत-पाकिस्तान वनडे क्रिकेटमधील 10 सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंची केली निवड; विराट कोहली-रोहित शर्मा Out)

तिसऱ्या स्थानासाठी वॉनने हाशिम अमलाला निवडले. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणारा अमलाला सर्वश्रेष्ठ सलामीवीर फलंदाजांपैकी एक मानला जातो. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज डावखुरे फलंदाज डॅरेन लेहमन यांना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी स्थान देण्यात आले आहे. आणि 5 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी वॉनने इंग्लंडच्या जोनाथन ट्रॉटला संधी दिली. अशाप्रकारे वॉनने मजबूत मधलीफळी निवडली आहे. टक्कल असणाऱ्या सार्वकालिन टेस्ट इलेव्हनचे नेतृत्त्व वॉनने इंग्लंडच्या अनुभवी क्रिकेटपटू ब्रायन क्लोजकडे सोपवले. 1949 इंग्लंडकडून टेस्ट डेब्यू करणारे क्लोज सर्वात युवा खेळाडू होते.

 

View this post on Instagram

 

My Test cricket greatest ‘Bald Xl’ .. #Tuffers&Vaughan !!! 8pm on @5livesport 👶

A post shared by Michael vaughan (@michaelvaughan) on

वॉनने संघात विकेटकीपर म्हणून इंग्लंडचा माजी यष्टीरक्षक फलंदाज मॅट प्रायरची निवड केली आहे आणि तो संघाचा 7व्या क्रमांकाचा फलंदाज असेल. गोलंदाजी आक्रमणासाठी वॉनने ऑस्ट्रेलियाच्या डग बोलिंजर आणि नॅथन लायन या जोडीसमवेत पाकिस्तानच्या राणा नावेदला संघात स्थान दिले. 11 व्या खेळाडूसाठीवॉनने दोन नावं निवडली-इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीच आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज क्रिस मार्टिन.

पाहा मायकेल वॉनचे ‘Bald XI’: ग्रॅहम गूच, हर्शल गिब्स, हाशिम आमला, डॅरेन लेहमन, जोनाथन ट्रॉट, ब्रायन क्लोज (कॅप्टन), मॅट प्रायर, डग बोलिंजर, राणा नावेद, नॅथन लायन, जॅक लीच/क्रिस मार्टिन.