MI vs RCB IPL 2021: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाविरुद्ध इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 सलामीच्या लढतीपूर्वी, गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, संघातील वातावरण पूर्णपणे विद्युत आणि उत्तेजित आहे व खेळाडूंचे लक्ष्य आपल्या सहाव्या विजेतेपदावर आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने सलग दोन विजेतेपदही जिंकले आहेत. “संघातील भावना पूर्णपणे विद्युत आणि उत्साहपूर्ण आहे. नवीन हंगामाची ही सुरुवात आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. खेळाडू मैदानात उतरण्यासाठी खूप उत्साही आहेत. आमच्या संघात काही नवीन चेहरे देखील आहेत जे रोमांचक आहेत. आयपीएल (IPL) हा नेहमीच एक रोमांचक काळ असतो. त्यामुळे, खेळण्यासाठी उत्सुक आहोत. मला वाटते की यावर्षी देखील हे एक चांगले होईल. आशा आहे, आम्ही योग्य गोष्टी करू शकतो. आम्ही दुबईत जेथे सोडले तेथून आम्ही पुढे जाऊ शकतो,” मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये रोहितने म्हटले. (MI vs RCB IPL 2021: सलामीच्या सामन्यात बदलणार गेतविजेत्या मुंबई इंडियन्सचं नशीब? पहा IPL पहिल्या मॅचमधील ‘पलटन’ची चकित करणारी आकडेवारी)
ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने आणि जिमी नीशम या न्यूझीलंडच्या त्रिकुटाबद्दल बोलताना कर्णधार म्हणाला की, या संघात त्यांची चांगली भर आहे आणि यंदा हंगामात तो बोल्टकडून त्याच गोष्टींची अपेक्षा करीत आहे. मागील आठवण्यात भारतात दाखल झालेले न्यूझीलंड खेळाडूं क्वारंटाइन राहून आता संघात सामील झाले आहेत आणि बोल्ट आता बेंगलोर संघाविरुद्ध सलामीचा सामना खेळण्याची अपेक्षा आहे. “मला खात्री आहे की मैदानात परतण्यासाठी ते सर्व उत्साहित आहेत. ते सात दिवसांपासून क्वारंटाइन आहेत आणि मला माहित आहे की जेव्हा आपण पहिल्या दिवशी बाहेर पडाल तेव्हा कसे वाटते. फक्त ताजी हवा घेण्याचा आणि मैदानात असणे व आपल्या आवडीनुसार कार्य करणे चांगले आहे. तयामुळे, मला खात्री आहे की त्या तिघांनाही असेच वाटत होते. जिमी नीशमला मुंबई इंडियन्स संघात आणि आधी संघाचा भाग असलेले अॅडम मिल्ने असणे चांगले आहे. मागच्या हंगामात ट्रेंटने आमच्यासाठी मोठा वाटा उचलला होता, यावर्षीही त्याच्याकडून अशीच अपेक्षित असेल,” रोहित म्हणाला.
"Looking forward to get going!" 💪💙#KhelTakaTak #OneFamily #MumbaiIndians #MI #IPL2021 @ImRo45 pic.twitter.com/yS6IQtzxks
— Mumbai Indians (@mipaltan) April 9, 2021
दुसरीकडे, पीयूष चावलाच्या संदर्भात कर्णधार रोहित म्हणाला, “तो आयपीएल सामन्यांमध्ये खूप अनुभवी आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएल खेळत आहे आणि संघ त्याच्याकडून काय अपेक्षा करतो हे त्याला माहित आहे. आम्ही शोधत असलेली विविधता तो संघात आणतो. मी माझ्या U-19 दिवसात त्याच्या सोबत खेळलो आहेत म्हणून मी त्याला चांगलाच ओळखतो, तो देखील मला चांगला ओळखतो. मैदानावर आमच्या दोंघांमधील ही मैत्री दिसून येईल,” हिटमॅनने म्हटले.