MI vs PBKS IPL 2021 Match 17: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 17व्या सामन्यात केएल राहुलच्या (KL Rahul) पंजाब किंग्सने (Punjab Kings) चेपॉकच्या (Chepauk) मैदानावर खेळण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरोधात 9 विकेटने जबरदस्त विजय मिळवला. पंजाबने टॉस जिंकून मुंबईला पहिले फलंदाजीला बोलावले आणि गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर संघाला 130 धावांवर रोखलं. अशाप्रकारे गतविजेत्या मुंबईने दिलेल्या 131 लक्ष्याच्या प्रत्युत्तरात संघाने ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून सहज विजय मिळवला आहे. कर्णधार राहुलने पुढाकार घेत संघाला विजयीरेष ओलांडून दिली. चेपॉकच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर बॅटिंग करत राहुलने सर्वाधिक नाबाद 60 धावांची अर्धशतकी खेळी केली. क्रिस गेल (Chris Gayle) 43 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, बॅटनंतर मुंबई संघ चेंडूने देखील प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. संघाकडून राहुल चाहरला (Rahul Chahar) एकमात्र विकेट मिळाली. (MI vs PBKS IPL 2021: अंपायरच्या निर्णयावर Rohit Sharma भडकला, हातवारे करून दिली अशी रिअक्शन, पहा Video)
मुंबईने दिलेल्या माफक धावसंख्येच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पंजाबसाठी राहुलने सलामी साथीदार मयंक अग्रवालसोबत सुरुवात केली. दोघांनी पॉवरप्लेचा चांगला फायदा करून घेत संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. राहुल आणि मयंकमध्ये पहिल्या विकेटसाठी 53 धावांची अर्धशतकी भागीदारी झाली ज्याने संघाच्या विजयाचा पाय घातला. संघ विजयाच्या शोधात असताना राहुलने मयंकला तंबूत धाडलं. त्यांनतर, राहुल व गेलच्या जोडीने संघाचा विजय निश्चित केला. दोघे नियमित अंतराने चौकार-षटकार मारत राहिले ज्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांवर दबाव आणला. राहुल आणि गेलने 53 चेंडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. मुंबईचा 5 सामन्यातील हा तिसरा तर सलग दुसरा पराभव ठरला. दुसरीकडे, सलग तीन सामने गमावलेल्या पंजाबने दुसरा सामना जिंकला. यापूर्वी, पंजाब किंग्सने आयपीएल 14च्या आपल्या सलामीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 4 धावांनी विजय मिळवला होता.
यापूर्वी, टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या मुंबईची पुन्हा एकदा अडखळत सुरुवात झाली. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 131 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार रोहित शर्माने 63 तर सूयकुमार यादवने 33 धावांची खेळी केली. सुरुवातीला झटपट दोन विकेट गमावल्यावर रोहित-सूर्यकुमारने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला, पण मधल्या फळीतील फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केल्यामुळे संघाला मोठी धावसंख्या गाठता आली नाही.