MI vs KKR, IPL 2019 Live Cricket Streaming: ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना, मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर
MI vs KKR, IPL 2019 (Photo Credits: File Photo)

इंडियन प्रिमियर लीग (Indian Premier League) च्या 12 व्या सीजनमधील अखेरचा सामना आज वानखेडे स्टेडियम वर (Wankhede Stadium) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्स संघ पूर्वीच प्ले ऑफमध्ये पोहचलेला असल्याने कोलकता संघासाठी हा सामना 'करो या मरो'चा असणार आहे. कोलकता संघ हा सामना हरल्यास हैद्राबादला प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी मिळेल.

कुठे पहाल लाईव्ह सामना आणि स्कोअर?

मुंबई विरुद्ध कोलकता हा सामना तुम्ही टीव्ही प्रमाणे ऑनलाईन देखील पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबई विरुद्ध कोलकता नाणेफेक:

मुंबई विरुद्ध कोलकता या आजच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

असे असतील संघ:

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, युवराज सिंग, क्रुणाल पांड्या, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, मयंक मारकंडे, राहुल चाहर, अनूकुल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तारे, क्विंटन डी कॉक, एविन लुइस, केरन पोलार्ड, बेन कटिंग, मिशेल मॅक्लेनघन, एडम मिल्ने, जेसन बेहरेनडॉर्फ, अनमोलप्रीत सिंह, बरिंदर सरन, पंकज जायसवाल, रसिख सलाम, जसप्रीत बुमराह.

कोलकाता नाईट रायडर्स: दिनेश कार्तिक (कर्णधार), सुनील नरेन, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रॅथवेट, जो डेनली, लॉकी फग्र्यूसन, क्रिस लिन, रॉबिन उथप्पा, हॅरी गर्नले, कुलदीप यादव, पीयुष चावला, नितीश राणा, संदीप वॉरियर, के.सी. करियप्पा, शुभमन गिल, श्रीकांत मुंधे, निखिल नाईक, पृथ्वी राज आणि प्रसिद्ध कृष्णा.