मुंबई इंडियन्स (Photo Credit: Twitter/IPL)

MI vs CSK, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 41व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीएसकेची (CSK) हाराकिरी आजच्या सामन्यात देखील सुरूच राहिली. एमआय गोलंदाजांपुढे सीएसके फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावरून 114 धावा केल्या आणि मुंबई इंडियन्ससमोर 115 धावांचे लक्ष्य ठेवले. सीएसकेचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यावर सॅम कुरनने (Sam Curran) संयमी खेळी केली आणि टीमला धावांपर्यंत मजल मारून दिली. सीएसकेच्या तीन फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही तर आघाडीचे दिग्गज फलंदाज स्वस्तात माघारी परतले. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात. आजच्या सामन्यात एमएस धोनीला बॅटने 16 धावत करता आल्या. सॅम कुरनने सर्वाधिक 52 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, मुंबईसाठी ट्रेंट बोल्टने (Trent Boult) 4, जसप्रीत बुमराह आणि राहुल चाहर यांना प्रत्येकी 2, नॅथन कोल्टर-नाईलने 1 विकेट मिळाली. (CSK vs MI, IPL 2020: रोहित शर्माची सुपर किंग्सविरुद्ध सामन्यातून माघार; 'हिटमॅन' मुंबई इंडियन्सकडून दुसरा, तर आयपीएल करिअरमधील तिसऱ्या सामन्याला मुकला)

टॉस गमावून पहिले फलंदाजी करत चेन्नईचा सलामीवीर रुतुराज गायकवाड ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता पायचीत झाला आणि सुपर किंग्सना एक धावही न करता पहिला झटका बसला. त्यांनतर पुढील ओव्हरमध्ये बुमराहने सलग दोन चेंडूतवर अंबाती रायुडू आणि एन जगदीशन यांना माघारी धाडले. रायुडूने 2 धाव केल्या तर जगदीशन शून्यावर माघारी परतला. आजवर आयपीएलमध्ये टीमसाठी एकमेव चमकदार कामगिरी करणारा फाफ डु प्लेसिस यंदा अपयशी ठरला आणि स्वस्तात बाद झाला. बोल्टने त्याला एका धावेवर माघारी धाडलं. अष्टपैलू रविंद्र जाडेजा मोठा फटका मण्याच्या प्रयत्नात 7 धावांवर बाद झाला आणि अवघ्या 21 धावांवर चेन्नईचा निम्मा संघ तंबूत परतला. संयम खेळ करणाऱ्या धोनीला चाहरच्या फिरकीवर एक षटकार लगावला पण पुढच्या चेंडूवर तसाच फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. दीपक चाहर शून्यावर बाद झाला आणि 'येलो आर्मी'ने अवगघ्या 43 धावांवर 7 विकेट गमावल्या. आयपीएलच्या 13व्या सत्रातील ही संघाने केलेली दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.

दरम्यान, आजच्या सामन्याला मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्माला हॅमस्ट्रिंग मुकावे लागले आहे. त्याच्या जागी किरोन पोलार्ड एमआयचे नेतृत्व करत आहे, तर सीएसकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले. शेन वॉट्सन, केदार जाधव आणि पियुष चावला यांना बाहेर केले असून त्यांच्या जागी इमरान ताहीर, एम जगदीशन आणि रुतुराज गायकवाड यांना संधी मिळाली आहे.