IPL 2019 Final: आयपीएल 12 च्या विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांचे हटके डान्स सेलिब्रेशन (Watch Video)
IPL 2019 Champions Mumbai Indians (Photo Credits: IANS)

MI vs CSK, IPL 2019 Final: आयपीएल 2019 च्या विजेतेपदाला गवसणी घातल्यानंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने हटके सेलिब्रेशन केले. रोमांचक अशा लढतीत शेवटच्या क्षणी मुंबई इंडियन्स संघ अवघ्या एका धावाने विजयी ठरला. चौथ्यांदा आयपीएल 12 चा चषक आपल्या नावे करण्याचा विक्रम मुंबई संघाने साधला. मुंबई संघाच्या या विजयानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे भरते आले तर सेलिब्रेशनमध्ये मुंबई संघ कुठे मागे राहिला नाही.

हिटमॅन रोहित शर्मा याच्या संघाने विजयाचे जबरदस्त सेलिब्रेशन केले. रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांचे रॅम्प सॉन्ग आणि त्यावरील डान्स व्हिडिओ सध्या समोर आला असून तो सोशल मीडियात चांगलाच गाजत आहे.

पहा व्हिडिओ:

 

यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने 2013, 2015, 2017 मध्ये आयपीएल चषक आपल्या नावे केलं होतं. त्यानंतर आता 2019 मध्येही मुंबईने बाजी मारली आहे.