Melbourne Renegades vs Perth Scorchers 10th Match Big Bash League 2024-25 Dream11 Team Prediction: बिग बॅश लीग 2024-25 चा 10 वा सामना आज 23 डिसेंबर रोजी मेलबर्न रेनेगेड्स विरुद्ध पर्थ स्कॉचर्स (MLR vs PRS BBL 2024-25) यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मेलबर्नच्या डॉकलँड्स स्टेडियमवर होणार आहे. मेलबर्न रेनेगेड्सने या स्पर्धेत आता दोन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एकाने विजय तर एकाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत मेलबर्न रेनेगेड्स संघ 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पर्थ स्कॉचर्स संघानेही या स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एकाने विजय तर एकाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पर्थ स्कॉचर्स संघ 2 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
जेक फ्रेझर-मॅकगर्क हा मेलबर्न रेनेगेड्सचा स्फोटक फलंदाज आहे. जो पर्थ स्कॉचर्सविरुद्ध मोठी इनिंग खेळू शकतो. याशिवाय जोश ब्राउन आणि जेकब बेथेलला तुमच्या टीममध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. हे दोन्ही खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत त्यामुळे ड्रीम11 संघासाठी ते चांगले पर्याय असतील. तर पर्थ स्कॉचर्सकडून, तुम्ही एक किंवा दोन्ही कीटन जेनिंग्स आणि ॲश्टन टर्नर तुमच्या संघात ठेवू शकता. जो आपल्या संघासाठी मोठी खेळी खेळू शकतो.
यष्टीरक्षक संघात कोणाचा समावेश करावा?
मेलबर्न रेनेगेड्सचे टिम सेफर्ट आणि लॉरी इव्हान्स हे यष्टिरक्षक आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही जोश इंग्लिस, फिन ॲलन आणि मॅथ्यू हर्स्टचा समावेश तुमच्या ड्रीम 11 संघात पर्थ स्कॉचर्सकडून करू शकता.
मेलबर्न रेनेगेड्स वि पर्थ स्कॉचर्स ड्रीम11 अंदाज: अष्टपैलू आणि गोलंदाजांची निवड
दोन्ही संघ अष्टपैलू खेळाडूंनी भरलेले आहेत. मेलबर्न रेनेगेड्ससाठी कॅप्टन विल सदरलँड हा चांगला पर्याय असेल. जो बॉल आणि बॅट दोन्हीने चांगली खेळी खेळू शकतो. तो अनुभवी खेळाडू देखील आहे. याशिवाय मेलबर्न रेनेगेड्ससाठी फर्गस ओ'नील हा देखील चांगला पर्याय असेल.
सर्वोत्तम ड्रीम 11 टीम
यष्टिरक्षक: टिम सेफर्ट आणि जोश इंग्लिस, याशिवाय फिन ॲलनचा पर्यायही आहे.
फलंदाज: जेक फ्रेझर-मॅकगर्क, कीटन जेनिंग्ज, जेकब बेथेल
अष्टपैलू: विल सदरलँड, कूपर कोनोली, फर्गस ओ'नील
गोलंदाज: थॉमस स्टीवर्ट रॉजर्स, झाय रिचर्डसन, जेसन बेहरेनडॉर्फ
कर्णधार आणि उपकर्णधार: विल सदरलँड (कर्णधार), कूपर कॉनोली (उपकर्णधार).
दोन्ही संघांचे खेळाडू
मेलबर्न रेनेगेड्स: जेक फ्रेझर-मॅकगर्क, जोश ब्राउन, टिम सेफर्ट (विकेटकीपर), जेकब बेथेल, लॉरी इव्हान्स, मॅकेन्झी हार्वे, विल सदरलँड (सी), फर्गस ओ'नील, थॉमस स्टीवर्ट रॉजर्स, ॲडम झाम्पा, केन रिचर्डसन.
पर्थ स्कॉचर्स: फिन ऍलन, कीटन जेनिंग्स, कूपर कॉनोली, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ॲश्टन टर्नर (सी), मॅथ्यू हर्स्ट, निक हॉब्सन, ॲश्टन अगर, झ्ये रिचर्डसन, जेसन बेहरेनडॉर्फ, लान्स मॉरिस.