मेगन स्कट आणि मेग लॅनिंग (Photo Credit: Getty)

ऑस्ट्रेलियाची महिला वेगवान गोलंदाज मेगन स्कट्ट (Megan Schutt) ने वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध तिसर्‍या वनडे सामन्यात हॅटट्रिक घेत इतिहास रचला आहे. व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये दोन हॅटट्रिक घेणारी मेगन पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. मेगनच्या या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिज संघाला केवळ 180 धावांमध्ये गुंडाळले. 181 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात एलिसा हेली (Alisa Hailey) आणि कर्णधार मेग लॅनिंग (Meg Lanning) यांच्या अर्धशतकांसह यजमानांना 8 विकेटने पराभूत करून 3-0 अशी आघाडी मिळविली. हेलीने 61 तर लॅनिंगने 59 धावा केल्या. स्कट ऑस्ट्रेलियाच्या वनडे सामन्यात हॅटट्रिक घेणारी पहिली महिलाही ठरली. यापूर्वी तिने मागील वर्षी मार्चमध्ये भारताविरुद्ध टी-20 मॅचमध्ये हॅटट्रिक घेतली होती. यात तिने सलामीवीर स्मृती मंधाना, कर्णधार मिताली राज आणि दीप्ती शर्मा यांना मुंबईच्या ब्राबोर्न स्टेडियमवर बाद सततच्या गोलंदाजीनवर बाद करत हॅट-ट्रिक घेतली.

स्कटने 9.3 षटकांपर्यंत कोणतीही विकेट घेतली नव्हती परंतु त्यानंतरच्या तीन चेंडूंमध्ये चिनेल हेनरी, करिश्मा रामहरक आणि एफि फ्लेचरला बाद करून तिने ही कामगिरी केली. महिला वनडेमधील ही 11 वी हॅटट्रिक आहे. यापूर्वी इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी हॅटट्रिक केली.

स्कटशिवाय कर्णधार लॅनिंगने महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावत इतिहास रचला. विंडीज महिला संघाविरुद्ध अर्धशतक करत लॅनिंगऑस्ट्रेलियाच्या खेळातील तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वोच्च धावा करणारी फलंदाज ठरली. ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावा करणारी महिला धावपटू म्हणून तिने कल्पित कारेन रोल्टनला मागे टाकले आणि हा कीर्तिमान मिळवला. लाँनिंगने आजवर ऑस्ट्रेलियाचा तिन्ही फॉरमॅटमध्ये 6233 धावा केल्या आहेत.