'Run-Machine' विराट कोहली याच्यासारखा दिसणारा पुणेचा 'हा' युवा बनला रातोरात स्टार; दोन हवालदार करतात सुरक्षा
विराट कोहली, सौरभ गाडे, (Photo Credit: Twitter)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 10 ऑक्टोबरपासून पुण्यात खेळला जाणार आहे. भारताने पहिला सामना जिंकला आहे आणि मालिकेत 1-0 अशी आघाडीदेखील मिळवली आहे. आता दुसरा सामना जिंकून या मालिकेत अपराजित आघाडी घेण्याच्या उद्देशाने संघ मैदानात उतरेल. आफ्रिकाविरुद्ध दुसरा सामना विराट कोहली (Virat Kohli) याचा कर्णधार म्हणून 50 वा टेस्ट सामना असणार आहे. भारतीय कर्णधार आणि सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी असलेल्या विराटला कोणत्याही परिचयाची गरज नाही. कोहली त्याच्या क्रिकेटच्या मैदानावरील खेळणे लोकांच्या मनावर राज्य करत आहे, पण तुम्हाला माहिती आहे की विराटचा एक फॉर्म असादेखील आहे ज्याची बहुतेक लोकांना माहिती नसेल. कोहली हा व्यवसायाने क्रिकेटर नाही, तर तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत जुनिअर अभियंता म्हणून काम करतो. चकित झाला ना? आम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहो तो म्हणजे विराटसारखा दिसणारा सौरभ गाडे (Saurabh Gade). (IND vs SA 2nd Test: सौरव गांगुली याचा 'हा' रेकॉर्ड मोडत एमएस धोनी च्या विक्रमाकडे विराट कोहली टाकणार अजून आणखी एक पाऊल, वाचा सविस्तर)

जेसीबीमध्ये जुनिअर अभियंता म्हणून कार्यरत सौरभला कोहलीसोबतच्या साम्यचा बराच फायदा होत आहे. त्याला राजकीय प्रचारांमध्ये बोलावले जाते, एखाद्या नव्या लघुउद्योगाचे उद्घाटन त्याच्या हस्ते होते आणि बरेच काही. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मागील वर्षी कोहलीसारखा दिसणाऱ्या सौरभचे आयुष्य पूर्णपणे बदलले, जेव्हा एका स्थानिक आमदारांनी त्यांना पाहिले आणि राजकीय प्रचारांमध्ये येण्यास आमंत्रित केले.  महाराष्ट्राच्या शिरूर जिल्ह्यातील रामलिंगा ग्रामपंचायतीच्या सरपंच उमेदवाराने संपूर्ण गावात जाहीर केले की विराट कोहली आपल्या सभेत येत आहेत. भारतीय कर्णधाराची सर्व ठिकाणी पोस्टर्सदेखील लावली गेली. पण, अखेर कोहलीच्या जागी सौरभ तिथे पोहचला. विराटसारखीच दाढी, चष्मा. विराटसारख्या दुसऱ्या सौरभवर गावातल्या लोकांनी भरपूर प्रेम केलं आणि ऑटोग्राफदेखील घेतले.

सौरभला आजवर विराटला भेटण्याची संधी मिळाली नाही. मागील वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध पुणेमध्ये मॅचदरम्यान, सौरभ विराटला भेटण्याच्या अगदी जवळ होता. चाहत्यांमध्ये सौरभची क्रेझ इतकी आहार की चक्क तो दोन हवालदार आणि एक इन्स्पेक्टर त्याचे रक्षण करतात. दरम्यान, गुरुवारी पुण्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे अशा परिस्थितीत सौरभला विराटची भेट घेण्याची त्याची इच्छा पूर्ण करण्याची अजून एक संधी मिळेल.